Thur, Feb 9, 2023

दुर्वा मुसळेचे यश
दुर्वा मुसळेचे यश
Published on : 10 January 2023, 10:55 am
kan103.jpg
74513
दूर्वा मुसळे
दुर्वा मुसळेचे यश
कणकवली, ता. १० : शहरातील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची नववीतील विद्यार्थिनी दुर्वा नागेश मुसळे हिने सायन्स ऑलिम्पियाडमध्ये यश मिळविले आहे. तिने रिजनल रँकमधील स्पर्धेत ११ वा क्रमांक तर झोनल रँकमध्ये सहावा क्रमांक प्राप्त केला आहे. याखेरीज मुंबईतील डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत दुर्वा ही गुणवत्ता यादीमध्ये येऊन दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरली आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल बाल शिवाजी इंग्लिश मिडियमच्या संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.