पिंगुळीच्या ''ढ'' मंडळीची ''वाल्मिकी'' प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीच्या ''ढ'' मंडळीची ''वाल्मिकी'' प्रथम
पिंगुळीच्या ''ढ'' मंडळीची ''वाल्मिकी'' प्रथम

पिंगुळीच्या ''ढ'' मंडळीची ''वाल्मिकी'' प्रथम

sakal_logo
By

swt१०१८.jpg
७४५३६
वेंगुर्लेः ‘कलावलय’ आयोजित एकांकिका स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी परीक्षक, संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर.

पिंगुळीच्या ‘ढ’ मंडळीची ‘वाल्मिकी’ प्रथम
वेंगुर्लेतील एकांकिका स्पर्धाः कोल्हापूरची ‘चफी’ द्वितीय, ‘ओल्या भिंती’ तृतीय
सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १०ः येथे आयोजित प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ‘ढ’ मंडळी, पिंगुळीच्या ‘वाल्मिकी’ने प्रथम क्रमांक पटकावला. विवेकानंद कॉलेज, कोल्हापूरची ‘चफी’ द्वितीय, कलासक्त मुंबईची ‘ओल्या भिंती’ तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
बी. के. सी. असोसिएशन मुंबई पुरस्कृत व प्रा. शशिकांत यरनाळकर स्मृती खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ७ व ८ ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडली. विजेत्या पिंगुळी मंडळास प्रथम क्रमांकाचे रोख १० हजार रुपये आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवलीच्या ‘स्वगत स्वगते’ एकांकिकेने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शन प्रथम - शंतनू पाटील (चफी), द्वितीय - तेजस म्हसके व विठ्ठल तळवलकर (वाल्मिकी), तृतीय - योगेश कदम (ओल्या भिंती) यांनी पटकाविला. त्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले.
पुरुष अभिनयात प्रथम - रमेश घाडी (वाल्मिकी), द्वितीय - यश शिदे (चफी), तृतीय - योगेश जळवी (मधुमाया) यांनी पटकावला. त्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रुपये रोख व चषक देण्यात आले. स्त्री अभिनयात प्रथम-श्रद्धा परब (वाल्मिकी), द्वितीय - मंगल राणे (स्वगत स्वगते), तृतीय - धनश्री गाडगीळ (आधे - अधुरे) यांनी पटकावला. त्यांना अनुक्रमे १०००, ७५०, ५०० रुपये रोख व चषक देण्यात आले.
नेपथ्यात प्रथम - सुशांत तांबे (लाडाची लेक), प्रकाश योजना - शाम चव्हाण (ओल्या भिंती), पार्श्वसंगीत - कलमेश मेस्त्री, मिहिर मेस्त्री, ओंकार म्हसके (वाल्मिकी) यांना रोख ७५० रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी परीक्षक ज्ञानेश मुळे, रविदर्शन कुलकर्णी, कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, खजिनदार सुनील रेडकर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.