संक्षिप्त-काँग्रेसची 14 ला मालवणात सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त-काँग्रेसची 14 ला 
मालवणात सभा
संक्षिप्त-काँग्रेसची 14 ला मालवणात सभा

संक्षिप्त-काँग्रेसची 14 ला मालवणात सभा

sakal_logo
By

वायंगणीत दादा महाराजांना वंदन
मालवण : वायंगणी येथील श्री दत्त साक्षात्कारी संत दादा महाराज प्रभू यांच्या ५२ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री समर्थ दादा महाराज समाधी व दत्त मंदिर, वायंगणी येथे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. वायंगणी येथील दादा महाराज प्रभू यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी रामदास प्रभू यांच्या हस्ते विधिवत पूजा झाली. यावेळी निशाण फेरी काढण्यात आली. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. चंद्रकांत कावले व सहकारी व ओम साई प्रासादिक भजन मंडळाचे भजन झाले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दादा महाराज यांच्या चरित्रावर यापूर्वी दोन भागात पुस्तके प्रकाशित करणारे महाराजांचे उपासक सीताराम ऊर्फ नाना करमळकर यांनी तिसऱ्या भागाचे पुस्तकही प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचे लिखाण निवृत्त शिक्षक विनायक कोळंबकर यांनी केले आहे. या पुण्यतिथी कार्यक्रमास नाना करमळकर, उद्योजक डॉ. दीपक परब, हनुमंत प्रभू, रामदास प्रभू, दामोदर साळकर, अंभू प्रभू आदी उपस्थित होते.
---
काँग्रेसची १४ ला मालवणात सभा
मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस निरीक्षक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर यांच्या सूचनेनुसार व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका काँग्रेस कमिटीची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक १४ ला सकाळी ११ वाजता फोवकांडा पिंपळ येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांनी दिली. या बैठकीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार व संघटन बाबींवर चर्चा करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व विभागांचे, सेलच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा सरचिटणीस तथा विधानसभा नेते अरविंद मोंडकर यांच्या फोवकांडा पिंपळ येथील जनसंपर्क कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन धुरी यांनी केले आहे.