एक दिवस नात्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक दिवस नात्यासाठी
एक दिवस नात्यासाठी

एक दिवस नात्यासाठी

sakal_logo
By

rat१०३७.txt

बातमी क्र..३७ ( पान २ )

rat१०p२७.jpg ः
७४५१५
कुरवलखेड ः नात्यांची वीण अधिक घट्ट करण्यासाठी जमलेले शेकडाभर नातेवाईक

‘एक दिवस नात्यासाठी’ उपक्रम

नात्याची वीण अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न ; कुरवलखडे गावात लाड यांचा पुढाकार


सकाळ वृत्तसेवा ः
संगमेश्वर, ता. १० ः सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला एकमेकांकडे जाणे आणि नाते समजून घेऊन ते जपणे खूपच अवघड झालेय. अशा स्थितीत नाते म्हणजे काय, प्रत्येक नातेवाईकाचं असणार नातं, नात्याचा परिचय व त्याच आनंदात व प्रसंगात महत्व किती? हे जाणून घेण्यासाठी धकाधकीच्या जीवनात ''एक दिवस नात्यासाठी'' हा विचार मनात येऊन उदात्त हेतूने अनेक नातेवाइकांना एकत्र करण्याचं काम खेड तालुक्यातील कुरवलखेड या गावात संजय लाड व बंधू लाड यांनी नुकतेच केले होते.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले कुरवलखेड येथे या स्नेहमेळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वरचेवर मैत्रीच्या संपर्कात जरूर राहा. मनसोक्त पैसे व वेळ खर्च करा. आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा शेवट होईल तेव्हा येथील कोणतीही गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही. आपला देह मातीत मिसळून जाईल तेव्हा कुणी आपले कौतुक केले काय, टीका केली काय? जीवनाचा आणि स्वकष्टाने मिळवलेल्या पैशाचा आनंद घेतलाच पाहिजे. त्याप्रमाणे परंपरेप्रमाणे चालत आलेली नाती, जागी ठेवून टिकवली पाहिजेत. आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या नातेवाईक कुटुंबाला एकत्र करण्याचा बेत व त्याप्रमाणे या भव्य कार्यक्रमाचे सुंदर नियोजनही केले होते. हास्यविनोद, गप्पागोष्टी, थोरांचे विचार व संस्कार, अनेक व्यक्तींचा परिचय, नात्याची जपणूक, आनंदातील सहभागाप्रमाणे दुःख गांभीर्याचे प्रसंग यासाठी सहभाग देऊन यापुढे लहानथोर मंडळींनी आपली नाती नक्की जतन करूया व हाय हॅलो करून प्रतिसाद देण्याप्रमाणे वेळेनुसार प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन हरवत चाललेली नात्यातील आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सुख-दुःखं इत्यादी गोष्टीत आनंद मिळवूया. हीच आपल्यातून गेलेल्या आपल्या बांधवांना खरी आदरांजली ठरेल, यात दुमत नाही. अशा गप्पानी रंगलेल्या विचारानंतर नात्यांची वीण अधिक घट्ट करायला शंभरपेक्षा अधिक नातेवाईक कोणताही समारंभ अथवा कार्यक्रम नसतात मुद्दामहून वेळ काढून आणि सर्व अडचणींवर मात करत एकत्र आले होते.

आनंददायी सोहळ्यासाठी यांचा पुढाकार
नात्यातील वीण अधिक घट्ट करण्यासाठी हा आनंददायी सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी शरद देवळेकर, सौरभ लाड, सचिन पाटणे, संतोष खातू, मधुकर लाड आदींनी पुढाकार घेतला.
------------