सावंतवाडीत १६ पासून व्याख्यानमालेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत १६ पासून
व्याख्यानमालेचे आयोजन
सावंतवाडीत १६ पासून व्याख्यानमालेचे आयोजन

सावंतवाडीत १६ पासून व्याख्यानमालेचे आयोजन

sakal_logo
By

सावंतवाडीत १६ पासून
व्याख्यानमालेचे आयोजन
सावंतवाडी, ता. १० ः श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भुवन सावंतवाडी यांच्यातर्फे देशभक्त प्रभाकरपंत कोरगावकर व्याख्यानमाला १६ ते २० जानेवारी २०२३ या कालावधीत सायंकाळी सहाला श्रीराम वाचन मंदिर येथे आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेचे उद्‌घाटन १६ ला सायंकाळी ६ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी कोल्हापूर येथील कोरगावकर ट्रस्टचे विश्वस्त आशिष कोरगावकर उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेत १६ ला बेळगाव येथील प्राध्यापक आनंद मेणसे यांचे ‘जागतिक फैसिझमचे संकट’ या विषयावर, १७ ला ‘शाश्वत पर्यटन’ विषयावर निसर्गप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे यांचे, १८ ला ‘माध्यमांनी भारतीय लोकशाहीसमोर उभे केलेले आव्हान’, या विषयावर मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार अमेय तिरोडकर, १९ जानेवारीला ‘अभिव्यक्ती के खतरे’ विषयावर कोल्हापूर येथील पत्रकार विजय चोरमारे, २० ला ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्याने रोज सायंकाळी सहाला सुरू होतील. या व्याख्यानमालेचा लाभ घेण्याचे आवाहन वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे यांनी केले आहे.