दाभोळ ः दापोलीत 10.2 अंश सेल्सिअस,निचांकी नोंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः दापोलीत 10.2 अंश सेल्सिअस,निचांकी नोंद
दाभोळ ः दापोलीत 10.2 अंश सेल्सिअस,निचांकी नोंद

दाभोळ ः दापोलीत 10.2 अंश सेल्सिअस,निचांकी नोंद

sakal_logo
By

पान १

दापोली गारठली
१०.२ अंश सेल्सिअस तापमान; दिवसा पारा पुन्हा चढला
दाभोळ, ता. १० ः दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठाच्या हवामानशास्त्र विभागात आज पहाटे साडेपाचपर्यंत १०.२ इतके निचांकी तापमान नोंदवले गेले. थंडीच्या या हंगामातील या सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली.
आठवडाभरात कमी तापमानाची नोंद होत होती. साधारण तापमान १५ ते १६ अंश सेल्सिएसच्या दरम्यान होते. मात्र काल (ता.९) मध्यरात्रीनंतर तापमान घसरले. असले तरी काल रात्री दापोली शहर व परिसरात थंडीचा एवढा परिणाम जाणवला नसल्याने दापोलीकरांना हुडहुडी भरण्याएवढी थंडी जाणवली नाही. शहर व परिसरातील नित्य व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होते. आज दिवसभरात तापमान वाढलेले होते.
जिल्ह्यात यावर्षी परतीचा पाऊस लांबला. साधारणपणे ऑक्टोबरअखेर आणि नोव्हेंबरच्या प्रारंभास जिल्ह्यात थंडीला प्रारंभ होतो. यंदा नोव्हेंबरमध्ये एक-दोन दिवसच थंडीची चाहूल लागली. मात्र, त्यानंतर पुन्हा ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस पुन्हा दोन-चार दिवस थंडी पडली; परंतु मंदौस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरण होऊन थंडी कमी झाली. त्यानंतर थंडीत सतत चढउतार होते. सोमवारी (ता. ९) सायंकाळपासून जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले. आतापर्यंत गुंडाळून ठेवलेले स्वेटर्स लोकांनी बाहेर काढले. जागोजागी शेकोट्या पुन्हा एकदा पेटल्याचे चित्र आहे. दरम्यान, या वर्षातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद आज झाली असून, हे तापमान १०.२ अंश सेल्सियस इतके होते.
राज्यातील काही भागात थंडीची तीव्र लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. थंडीची लाट पुढील ५ दिवस राहील, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता; मात्र त्याचा फारसा परिणाम दापोलीत जाणवला नाही.

कमाल व किमान तापमान असे
कोकण कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागात नोंदवले गेलेले किमान व कमाल तापमान असे ः ५ जानेवारी किमान १५.०२ अंश सेल्सियस. ६ जानेवारी १५.५ /३२.२, ७ जानेवारी १६.५ / ३२.२, ८ जानेवारी १५.६/३१.२, ९ जानेवारी १२.७ /३१.५.