
कोरोनात गावाला येऊन फुलवतोय कलिंगडाचा मळा
rat१११३.txt
बातमी क्र. १३ (टुडे पान ४ साठी, फ्लायर)
फोटो ओळी
-rat११p१९.jpg-
मनोज काजरेकर
-rat११p२०.jpg-डिंगणी (ता. संगमेश्वर) ः
७४७६३
कलिंगड लागवड करणारा मनोज रमेश काजरेकर.
-rat११p२१.jpg-
७४७६४
डिंगणीत मनोज यांनी फुलवलेला कलिंगडाचा मळा.
---
काही सुखद--लोगो
कोरोना काळात नोकरी गेल्याने फुलवतोय कलिंगडाचा मळा
डिंगणीतील मनोज काजेरकरची यशोगाथा ; दोन एकरवर लागवडीतून सुमारे ९५ टन उत्पादन
सुधीर विश्वासराव ः सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ११ ः कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये नोकरीला मुकावे लागल्याने अनेकजण बेकार झाले. आपल्या गावामध्ये उपजीविकेचे साधन बनावे यासाठी संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी येथील युवकाने गावातच प्रायोगिक तत्त्वावर कलिंगड लागवड केली. त्याला स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सलग तिसऱ्या वर्षी त्याने दोन एकर क्षेत्रामध्ये लागवड केली असून येत्या काही महिन्यात उत्पन्नाला सुरवात होणारा आहे. स्थानिक बाजारपेठेबरोबर मुंबईला कलिंगडे पाठविण्याचा विचार असल्याचे मनोज रमेश काजरेकर यांनी सांगितले.
मागील दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना महामारीच्या विळख्यात अडकले होते. जगण्यासाठी धडपड करत होते. अशावेळी जिद्दीने काहीजण या संकटांना यशस्वीपणे समोर जात होते. त्यातीलच एक युवा शेतकरी मनोज रमेश काजरेकर. गेली तीन वर्षे सेंद्रिय भाजीपाला आणि कलिंगड लागवड करत आहे. यंदाच्या वर्षी सुमारे १२००० कलिंगड रोपांची लागवड, टप्पटप्प्याने केली आहे. नियोजनाप्रमाणे हंगाम सुरू राहिल्यास अंदाजे ९० ते ९५ टन कलिंगडाचे उत्पादन येण्याचा अंदाज आहे. विक्रीसाठी संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण आणि मुंबई येथे संपर्क साधून विक्री नियोजन सुरू केले आहे. मनोज काजरेकर यांनी सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर एक एकरमध्ये कलिंगड लागवड केली होती. त्यांना जोड म्हणून भाजीपाला लागवड केली. यावर्षी दोन एकरमध्ये कलिंगड लागवड सेंद्रिय पद्धतीने केली आहे. यामध्ये त्यांना त्यांचा मित्र प्रशांत डिंगणकर यांची चांगली साथ मिळाली आहे.
याबाबत मनोज म्हणाले, कलिंगडासाठी लागणारी रोपे कोल्हापूर येथून आणले असून त्यांचे वाण मेलडी व अवस्था अशा दोन प्रकारचे आहे. सध्या नऊ हजार रोपे लावली असून पाच हजार रोपांची लागवड प्रगतीपथावर आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने पीक मिळणार आहे. मागील दोन वर्षे स्थानिक बाजारपेठेमध्ये विक्री करण्याच्या निश्चय केला होता. त्याप्रमाणे रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, देवरूख आदी ठिकाणी मालाची विक्री करण्यात आली. यावर्षी कोरोना कमी झाल्यामुळे व्यवसायाच्या दृष्टीने जास्त प्रमाणात लागवड करून जास्त उत्पादन करण्याचा विचार आहे. डिसेंबरमध्ये केलेली लागवडतून ८५ दिवसांनंतर म्हणजेच फेब्रुवारीमध्ये उत्पादन सुरू होऊन विक्रीस प्रारंभ होईल. त्यामुळे ९० ते ९५ टन कलिंगड उत्पादन होण्याची शक्यता आहे.
--
कोट
या पिकाकरिता शेततळ्यातून पाणी दिले जाते. संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत आहे. फक्त जीवामृत, शेणखत, गांडूळ खताचा वापर करत असल्याने कलिंगडाचा दर्जा उत्तम आहे. त्यामुळे लोकांकडून मागणी वाढली आहे.
-मनोज काजरेकर, डिंगणी
---
दृष्टीक्षेपात...
* स्थानिक बाजारपेठेसह यावर्षी मुंबईतही विक्री
*१२ हजार रोपांची लागवड
* ९५ टन उत्पादनाचा अंदाज
* कोरोनामुळे मुंबईतील नोकरी गेली
* सेंद्रीय पद्धतीला प्राधान्य