कशेडी घाट ठरतोय अपघात प्रवणक्षेत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कशेडी घाट ठरतोय अपघात प्रवणक्षेत्र
कशेडी घाट ठरतोय अपघात प्रवणक्षेत्र

कशेडी घाट ठरतोय अपघात प्रवणक्षेत्र

sakal_logo
By

rat11p10.Jpg
74752
खेडः अपघात रोखण्यासाठी अपघात स्थळांवर लावण्यात आलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे.
rat11p11.jpg
74753
वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी महामार्गावर रंबल स्ट्रिप टाकण्यात आल्या आहेत; मात्र तरीही अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही.
-rat11p12.jpg ः
74754
तीव्र उतार व अवघड एस आकाराच्या वळणावर सिग्नल यंत्रणा उभारण्यात आली असली तरी ती सद्यःस्थितीत बंद पडली आहे.
----------------
कशेडी घाट मृत्यूचा सापळा
प्रवास असुरक्षित; रस्त्याची केवळ मलमपट्टी, अनेक अपघातानंतरही उपाययोजनांकडे दुर्लक्ष
खेड, ता. ११ः आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला सहा जानेवारीला रात्री भीषण अपघात झाला होता. माल वाहतूक करणाऱ्या डंपरने सुरक्षा भेदून आमदार कदम यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात आमदारांसह चालक व इतर पोलिस कर्मचारी बालंबाल बचावले असले तरी पुन्हा एकदा कशेडी घाटातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या कशेडी घाटात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे १३ किमी अंतराचा हा तीव्र उतार व नागमोडी वळणे असलेला घाट आहे. पूर्व-पश्चिम सह्याद्री पर्वताच्या उपरांगांमध्ये हा घाट तयार केला आहे. चौपदरीकरणात या घाटाला पर्यायी बोगदा तयार करण्याचे काम गेली चार वर्षे सुरू आहे; मात्र अद्यापही हे काम अपूर्णावस्थेत आहे. कशेडी घाटात पोलिस व महामार्ग विभाग प्रशासनाने वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांना डेंजर हॉटस्पॉट ठरवले आहे.
आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झालेल्या ठिकाणी ७ नोव्हेंबर २०२२ ला रिक्षा व डंपर यांचा भीषण अपघात झाला होता. कशेडी घाटातील चोळईजवळ वाळूने भरलेल्या डंपरखाली रिक्षा सापडली. यात रिक्षातील चालकासह इतर तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. माणगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरातील या विद्यार्थिनी रिक्षाने खेड-भरणे येथे डीएडच्या परीक्षेसाठी गेल्या होत्या. परीक्षा आटोपून परतत असताना हा अपघात झाला. कशेडी घाटातील चोळई गावच्या वळणावर वाळूने भरलेला डंपर रिक्षावर उलटला. त्यात चिरडून चौघांचा मृत्यू झाला होता. सद्यःस्थितीत अपघात रोखण्यासाठी तातडीने काही सुरक्षित वाहतुकीसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. चौपदरीकरणात नवीन तयार करण्यात येत असलेल्या बोगद्यामुळे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन तीन वर्षात या घाटातील रस्त्याच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे तर दुसरीकडे घाटात तात्पुरते खड्डे भरण्याचे दिखाऊपणाचे काम करण्यात आल्याचा दावा वाहनचालकांनी व्यक्त केला आहे.
सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची इंधन बचत करण्याची चुकीची सवयही या अपघाताचे एक कारण असल्याचे रस्ता सुरक्षेबाबत अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे मत आहे. अनेक वाहनचालक इंधन वाचवण्यासाठी आपले वाहन न्युट्रल करून घाट उतरत असल्याचे या अभ्यासकांचे मत आहे. याबाबत वाहनचालकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे तर याचबरोबर रखडलेल्या बोगद्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे.

चौकट
बोगद्याचे काम अद्याप अपूर्णच
२५ जानेवारी २०१९ ला रत्नागिरीचे तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. घाटाला पर्याय असलेल्या बोगद्याच्या कामाची ३० महिन्यांची मुदत डिसेंबर २०२० पर्यंत होती. तरीही अद्याप काम पूर्ण झालेले नाही.