प्रार्थना स्थळांवरील आवाजावर मर्यादा घालण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रार्थना स्थळांवरील आवाजावर
मर्यादा घालण्याची मागणी
प्रार्थना स्थळांवरील आवाजावर मर्यादा घालण्याची मागणी

प्रार्थना स्थळांवरील आवाजावर मर्यादा घालण्याची मागणी

sakal_logo
By

74811
सावंतवाडी ः पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याशी चर्चा करताना मनसेचे शिष्ठमंडळ.


प्रार्थना स्थळांवरील आवाजावर
मर्यादा घालण्याची मागणी
सावंतवाडी, ता. ११ ः तालुक्यातील प्रार्थना स्थळांवरील आवाजावर मर्यादा घालण्यात यावी, अशी मागणी मनसेनेच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी निवेदनही सादर केले. याबाबत योग्य ती कारवाई केली जाणार असून, प्रार्थना स्थळांच्या आवाजाची तीव्रता तपासली जाणार आहे, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
यावेळी माजी शहराध्यक्ष तथा मनविसेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, माजी उपजिल्हाध्यक्ष अॅड. अनिल केसरकर, सुधीर राऊळ, परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, म.न.वि.से उपजिल्हाध्यक्ष कौस्तुभ नाईक, माजी उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, दर्शन सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.