रॉक गार्डन रस्ता अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रॉक गार्डन रस्ता अंधारात
रॉक गार्डन रस्ता अंधारात

रॉक गार्डन रस्ता अंधारात

sakal_logo
By

रॉक गार्डन
रस्ता अंधारात
मालवणः कोरोना निर्बंधमुक्त जीवनामुळे यंदा मालवणात शैक्षणिक सहलींचा ओघ वाढल्याचे चित्र आहे; मात्र शहरासह तालुक्यातील रस्ते सध्या अंधारात आहेत. शहरातील अनेक पथदिवे बंदावस्थेत असून रॉक गार्डनकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही काळोखाचा सामना करावा लागत आहे. मालवण तहसील कार्यालय आणि मालवण पोलिस ठाणे यासारख्या प्रमुश शासकीय कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर रॉक गार्डन आहे. शहरातील प्रमुख दोन शासकीय कार्यालये आणि रॉक गार्डनसारख्या पर्यटनस्थळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असून याबाबत शहरवासीयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
.............
नारिंग्रे येथून
महिला बेपत्ता
देवगडः तालुक्यातील नारिंग्रे येथील एक विवाहित महिला बेपत्ता झाली आहे. सोमवारी (ता.९) सकाळपासून घरात कोणाला न सांगता ती निघून गेली आहे. तिचा सर्वत्र शोध घेऊन आज येथील पोलीसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण करीत आहेत.
.........................
दाभिल पुलासाठी
२ कोटी ३२ लाख
ओटवणेः बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथील दाभिल नदीवरील नियोजित पुलासाठी २ कोटी ३२ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलाच्या बांधणीसाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पुलाची लांबी ४० मीटर असून रुंदी १२ मीटर आहे. तर उंची सुमारे ६ ते ७ मीटर असणार आहे. यासाठी दाभिलचे माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू घाडी यांनी पाठपुरावा केला होता. सध्या या पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी रस्त्याचे काम सुरू असून येत्या तीन ते चार महिन्यांत काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे दाभिलवासीयांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
....................
परुळे येथे १५ पासून
दशावतार महोत्सव
वेंगुर्लेः परुळे येथील संस्कृती प्रतिष्ठान आयोजित श्यामसुंदर श्रीपाद सामंत स्मृती दशावतार नाट्यमहोत्सव १५ ते २४ जानेवारी या कालावधीत परुळे येथे आदिनारायण मंदिराच्या रंगमंचावर आयोजित केला आहे. १५ ला उद्घाटनानंतर सायंकाळी ७.३० वाजता ओंकार मंडळाचे ''शिवनंदिनी वाघेश्वरी'', १६ ला ७ वाजता वालावलकर मंडळाचे ''बालभुवनेश्वर'', १७ ला सायंकाळी ७ वाजता कलेश्वर नेरुर यांचे ''कर्ण पिशाच्च'', १८ ला सायंकाळी ७ वाजता बाळकृष्ण गोरे मंडळ (कवठी) यांचे ''वेडा चंद्रह'', १९ ला सायंकाळी ७ वाजता चेंदवणकर मंडळ (देवेंद्र नाईक) यांचे ''वेतीपात'', २० ला सायंकाळी ७ वाजता दत्त माऊली मंडळाचे ''कुक्कुटेश्वर महिमा'', २१ ला सायंकाळी ७ वाजता खानोलकर मंडळाचे ''पालीचा बल्लाळ'', २२ ला सायंकाळी ७ वाजता जय हनुमान मंडळाचे ''शिव महाकाल'', २३ ला सायंकाळी ७ वाजता पार्सेकर मंडळाचे ''सिध्दटेकचा सिध्दिविनायक'', २४ ला सायंकाळी ७ वाजता आरोलकर मंडळाचे ''म्हाळसा महिमा'' नाटक होणार आहे.
....................
आचऱ्यात २६ ला
अभंग गायन स्पर्धा
मालवणः आचरा-हिर्लेवाडी येथील माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे २६ ला जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेचे आयोजन तेथील पंढरीनाथ मंदिरात करण्यात आले आहे. स्पर्धा १६ ते ३० वर्षे वयोगटासाठी असून यासाठी अनुक्रमे ५००१, ३००१, २००० रुपये आणि प्रत्येकी चषक, तर उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. पारंपरिक अभंग बंधनकारक आहेत. सहभागी होण्यासाठी ऑनलाईन पात्रता फेरी घेण्यात येणार आहे. तीन मिनिटांचा एखादा अभंग गायनाचा व्हिडीओ २० जानेवारीपर्यंत पाठवावा. यातून १८ ते २० स्पर्धक निवडले जातील. इच्छुकांनी बंटी तांडेल, विनय वझे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.....................