करवसुलीसाठी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

करवसुलीसाठी आक्रमक
करवसुलीसाठी आक्रमक

करवसुलीसाठी आक्रमक

sakal_logo
By

rat१२२७.txt

( पान २ साठी मेन )

rat१२p१९.jpg ः
७५०४५
राजापूर नगर पालिका

राजापूर नगर पालिका करवसुलीत आक्रमक

मालमत्ता कर ५३ टक्के,पाणीपट्टी ५९ टक्के ; तीन महिनेच हाती


सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः मर्यादित उत्पन्नाचे स्रोत असलेल्या क वर्गीय राजापूर नगर पालिकेची मालमत्ता करापैकी गतवर्षीची थकित आणि चालू वर्षाचा कर असे मिळून ५३ टक्के करवसुली तर, पाणीपट्टीपैकी ५९ टक्के वसुली झाली आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये उर्वरित वसुली करण्याचे पालिका प्रशासनासमोर आव्हान ठाकले असून त्यासाठी मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन आक्रमक पवित्रा घेत अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.

गतवर्षीच्या थकितसह चालू वर्षाच्या करवसुलीसाठी कर्मचाऱ्‍यांची पथके गठित करण्यात आली असून या पथकांमार्फत घरोघरी भेट देणे, फोनद्वारे थेट संपर्क साधणे, नोटिसा बजावण्यावर पालिका प्रशासनाने भर दिल्याची माहिती करनिरीक्षक अविनाश नाईक यांनी दिली. त्याचवेळी थकित पाणीपट्टी असलेल्या सुमारे ६० नळ संयोजनांचा पाणीपुरवठा कापण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये काही शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. क वर्गीय नगर पालिकेचे स्वउत्पन्नाचे मर्यादित स्रोत असल्याने पालिकेने कराद्वारे मिळणारे उत्पन्न हेच हक्काचे उत्पन्नाचे स्रोत आहे; मात्र, या करवसुलीमध्ये कोरोना महामारीपासून अनियमितता येऊ लागल्याने त्याचा अप्रत्यक्षरित्या विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये मालमत्ता करापैकी गतवर्षीची थकित आणि चालू वर्षाचा कर असे मिळून ६४ लाख ६३ हजार ४२८ म्हणजे ५३ टक्के करवसुली डिसेंबरअखेरपर्यंत झाली आहे. पाणीपट्टीपैकी २२ लाख ७३ हजार ५९५ म्हणजे ५९ टक्के वसुली झाली आहे. नगर पालिकेकडून अनेक शासकीय कार्यालयांना नळसंयोजनाद्वारे पाणीपुरवठा केला आहे. त्यातून पालिकेला दरवर्षी सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यापैकी अनेक कार्यालयांनी चालू वर्षाच्या कराची भरणा अद्यापही केलेली नाही. त्याचवेळी गतवर्षीचीही कराची रक्कम भरणा न करता अद्यापही थकित ठेवलेली आहे. अशा स्थितीमध्ये आगामी तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये उर्वरित करवसुली करण्याचे आव्हान प्रशासनासमोर ठाकले आहे. त्यामुळे प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेताना करवसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे.


दृष्टिक्षेपात घरपट्टी वसुली

वर्ष*थकित रक्कम*वसुली रक्कम
२०२१-०२२* ४२ लाख १५ हजार ७१९*२१ लाख ३४ हजार २८८
२०२२-०२३*७८ लाख ८५ हजार ९०२*४३ लाख २९ हजार १४०


दृष्टिक्षेपात पाणीपट्टी वसुली

वर्ष*थकित रक्कम*वसुली रक्कम
२०२१-०२२*१० लाख ०९ हजार ६७४*८ लाख ४३ हजार ९९५
२०२२-०२३*२७ लाख ९८ हजार १५०*१४ लाख २९ हजार ६००