चिपळूण ः चिपळूण पंचायत समितीचे रेकॉर्ड ओकेमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  चिपळूण पंचायत समितीचे रेकॉर्ड ओकेमध्ये
चिपळूण ः चिपळूण पंचायत समितीचे रेकॉर्ड ओकेमध्ये

चिपळूण ः चिपळूण पंचायत समितीचे रेकॉर्ड ओकेमध्ये

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl१२४.jpg P२३L७५०११ः
चिपळूण ः पंचायत समितीमधील अभिलेख कक्षाची पाहणीदरम्यान सीईओ, बीडीओ आदी.
--------------
चिपळूण पंचायत समितीच्या रेकॉर्डचे कौतुक

सीईओंनी दिली भेट ; अभिलेख कक्षाचीही पाहणी

चिपळूण, ता. १२ ः प्रशासकीय कामकाज शासकीय कादपत्राचे व्यवस्थित जतन करणे, ते वर्गीकरणानुसार ठेवणे हा महत्वाचा भाग मानला जातो. काही ठिकाणच्या शासकीय कार्यालयतील दप्तरावरील धूळदेखील निघत नाही. असे असतानाच चिपळूण तालुक्यात विविध विकासकामांची पाहणी करण्यास आलेल्या जिल्हा परिषदेचे कीर्तीकिरण पुजार यांनी पंचायत समितीमधील अभिलेख कक्षाची पाहणी केली. या वेळी सर्व रेकॉर्ड योग्य तसेच स्वच्छतेची टापटीप असल्याचे दिसून आले. याबद्दल सीईओंनी पंचायत समितीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याचे कौतुक करत त्यांना शाबासकी दिली.
जिल्हा परिषदेचे सीईओ कीर्तीकिरण पुजार यांनी नुकतीच तालुक्यातील विविध गावांना भेट देत तेथील विकासकामांची पाहणी केली होती. यामध्ये त्यांना तालुक्यातील शासकीय विकासकामे प्रगतीपथावर असल्याचे आढळून आले होते. तालुक्यातील ग्रामीण भागाची पाहणी झाल्यानंतर त्यांनी पंचायत समितीला भेट दिली. पंचायत समितीच्या अभिलेख कक्षाला भेट दिली. शासकीय दप्तर रेकॉर्ड कशा रितीने जतन केले आहे. त्याचे योग्यप्रकारे वर्गीकरण केले की नाही याची स्थिती जाणून घेतली. शासकीय नियमानुसार शासकीय दस्तावेज हा अ, ब, क, डमध्ये वर्गीकरण करून ठेवावा लागतो. अ मध्ये कायमस्वरूपी जतन करून ठेवण्यात येणारी कागदपत्रे, ही कागदपत्रे लाल कपड्यात बांधून ठेवलेली असतात तर ब मध्ये ३० वर्षापर्यंतची कागदपत्रे पिवळ्या कपड्यात ठेवलेली असतात. क मध्ये १० वर्षापर्यंतची हिरव्या कपड्यात ठेवलेली असतात तर ड मध्ये असलेली कागदपत्रे आर्थिक वर्ष संपल्यानंतर जून ते ऑक्टोबर या कालावधीत निर्लेखित केली जातात. प्रशासकीय कामकाजाची कागदपत्रे योग्य तेथे ठेवली असल्यास आवश्यक त्या वेळी ती पटकन शोधता येतात. यात वेळेचा अपव्यय होत नाही. अनेक पंचायत समितीत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने या अभिलेखांचे योग्यप्रकारे वर्गिकरण होत नसल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अनुभव आहे; मात्र चिपळूण पंचायत समितीमधील अभिलेख कक्षाची पाहणी केल्यानंतर सीईओंनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या निमित्ताने गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात विविध विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे-पाटील यांच्यासह सहाय्यक गटविकास अधिकारी भास्कर कांबळे, सहाय्यक प्रशासन अधिकारी चौरे, विविध विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.