
स्टेट बँक ऑफ इंडियाचा देवगडमध्ये ग्राहक मेळावा स्टेट बँक ऑफ इंडियाचा देवगडमध्ये ग्राहक मेळावा
75070
देवगड ः येथील स्टेट बँक शाखेच्या ग्राहक मेळाव्यात शाखाधिकारी गणेश शिंदे यांनी सुरेश सोनटक्के यांचे स्वागत केले. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)
स्टेट बँक ऑफ इंडियाचा
देवगडमध्ये ग्राहक मेळावा
ग्राहकाभिमुख सेवेसाठी सूचना
देवगड, ता. १२ ः येथील स्टेट बँक ऑफ इंडिया, देवगड शाखेचा ग्राहक मेळावा उत्साहात झाला. यावेळी निवृत्तीवेतन धारकांना आर्थिक व्यवहार करताना सुलभता यावी, यासाठी महिन्याच्या दहा तारीखपर्यंत आवश्यकतेनुसार जादा कॅश काउंटर वाढवावेत, बँकांच्या ठेव योजना तसेच अन्य योजनांची माहिती फलकाद्वारे ग्राहकांना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावी, ग्राहकाभिमुख सेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, आदी सूचना करण्यात आल्या.
यावेळी ग्राहकांनी सकाळी एकाचवेळी शाखेत गर्दी न करता दुपारनंतर आल्यास सेवा देण्याच्या दृष्टीने अधिक सोयीचे ठरू शकते, असे शाखाधिकारी गणेश शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बँकेतील कर्मचारी तसेच त्यांच्या कामाच्या पध्दती याची माहिती देण्यात आली. तसेच बँकेची लॉकर सुविधा आणि त्याचे देयक, कर्ज सुविधा, पीक कर्ज याबाबतही माहिती देण्यात आली. शाखाधिकारी शिंदे यांनी उपस्थित ग्राहकांचे स्वागत केले. यावेळी सुरेश सोनटक्के, विलास रुमडे, सदानंद सावंत, प्रा. महेंद्र कामत, प्रा. गुरुदेव परुळेकर, दत्तात्रय बलवान, सुधीर मांजरेकर, बँकेचे सेवा व्यवस्थापक संदेश थोरवडे, फिल्ड ऑफिसर सिद्धार्थ बांदेकर आदी उपस्थित होते.