वार्षिक स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वार्षिक स्नेहसंमेलन
वार्षिक स्नेहसंमेलन

वार्षिक स्नेहसंमेलन

sakal_logo
By

rat१२३१.txt

बातमी क्र.. ३१ (पान ५ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
- ratchl१२७.jpg ः
७५०६३
चिपळूण ः स्नेहसंमेलनात कलागुण सादर करताना विद्यार्थिनी.
--
महाराष्ट्र हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन

चिपळूण, ता. १२ ः येथील चिपळूण एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण अॅण्ड ए. ई. कालसेकर ज्यु. कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्स, हाजी एस. एच. वांगडे प्रायमरी स्कूल आणि एम. आय. वांगडे नर्सरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संस्थेचे अध्यक्ष हसन जमालुद्दीन वांगडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन झाले. कार्यक्रमाची सुरवात कुराण पठणाने झाली. मुख्याध्यापक इलियास पटेल यांनी शाळेचा अहवाल सादर केला. संस्थेचा अहवाल चेअरमन रऊफ वांगडे यांनी सादर केला. विविध गुणदर्शनामध्ये प्राथमिकच्या मुलांनी हम्द, नात, मुशाहिरा तसेच अॅक्शनगीत सादर केले. त्यानंतर हायस्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कव्वाली, गझल, नाटिका, फोकडान्स आणि देशभक्तीपर गीतांचा सदाबहार कार्यक्रम सादर केला. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार झाला. प्रमुख पाहूणे म्हणून नईम हारून धामसकर, जबिउल्ला इलियास अहमद पटेल व कॅप्टन समीर मुनव्वर काझी उपस्थित होते.
-----
फोटो ओळी
-rat१२p२१.jpg ः
७५०६०
राजापूर ः भित्तीपत्रिकेचे फित कापून उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. पी. एस. मेश्राम.
---
खापणे महाविद्यालयात हिंदी दिन साजरा

राजापूर ः तालुक्यातील रायपाटण येथील श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात हिंदी अभ्यास मंडळामार्फत वैश्विक हिंदी दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या दर्पण या हिंदी साहित्याच्या भित्तीपत्रिकेचे प्राचार्य डॉ. पी. एस.मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाविद्यालयातील दुर्मिळ हिंदी ग्रंथांच्या भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचे हिंदी विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन हिंदी अभ्यासमंडळाचे प्रमुख एस. एस. धोंगडे यांनी केले. या भित्तीपत्रिकेची निर्मिती करण्यासाठी सायरा काझी, अरसीन गडकरी या विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.
--