अद्ययावत दाभिल पूल बांधकामासाठी अखेर श्रीगणेशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अद्ययावत दाभिल पूल बांधकामासाठी अखेर श्रीगणेशा
अद्ययावत दाभिल पूल बांधकामासाठी अखेर श्रीगणेशा

अद्ययावत दाभिल पूल बांधकामासाठी अखेर श्रीगणेशा

sakal_logo
By

75268
सरमळे ः येथील दाभिल नदीवरील पूल कामाला सुरुवात झाली आहे.

अद्ययावत दाभिल पूल बांधकामासाठी अखेर श्रीगणेशा

२ कोटी ३२ लाख निधी मंजूर; मे अखेरपर्यंत वाहतुकीस खुला होणे शक्य


ओटवणे, ता. १३ ः बांदा-दाणोली जिल्हा मार्गावरील सरमळे येथील दाभिल नदीवरील नियोजित पुलाच्या नूतन बांधणीच्या कामाला अखेरीस शुभारंभ झाला. या पुलाच्या बांधकाम करण्यासाठी सध्या पर्यायी रस्त्याचे काम सुरू असून लवकरच सुसज्ज असे अद्ययावत पूल प्रवांशासाठी वाहतुकीस खुले होणार आहे. या पूलासाठी २ कोटी ३२ लाख ८९ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. येत्या मे महिन्याच्या अखेरीस पर्यत या पुलाचे काम पूर्णत्वास जाणार आहे.
दाभिल नदिवरील या पुलांच्या पाया पासून खाबांसहित, वरच्या भागाला तडे तसेच मोठ मोठे खड्ड्ये पडल्याने पुल अतिशय कमकुवत स्थितीत गेली किती वर्षे खितपत पडून होता. बारामाही वाहणाऱ्या दाभिल नदिवरील या पुलाची ऊंची कमी असल्याने थोड्या अधिक पावसात हे पुल वारंवार पाण्याखाली असते. दाभिल, तेरेखोल, गड़नदीचा त्रिवेणी संगम या पुलाच्या १०० मीटर अंतरावर आहे. गड़नदीला पुर आल्यानंतर त्याचा उलट परिणाम दाभिल नदीच्या प्रवाहावर होऊन या पुलावर अधिकच पाण्याचा जोर वाढतो. त्यामुळे थोड्या अधिक पावसात देखील हे पुल पाण्याखाली जात होते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना समोरे जावे लागत होते.
बांदा-दाणोली मार्ग हा दोन महत्वाच्या पर्यटन ठिकाणांना जोडतो. आंबोली व गोवा राज्यातील पर्यटन ठिकाणांना जोडणारा हा पर्यायी व सुलभ मार्ग असे संबोधले जाते. आंबोली या थंड हवेच्या तसेच फेसाळणाऱ्या धबधब्याखाली मनमुराद आनंद घेण्यासाठी गोव्याच्या पर्यटकांची या मार्गावरुन मोठी वर्दळ असते तर कोल्हापुर, बेळगाव, पुणे येथून कच्चा माल, भाजीपाला गोवा येथे नेण्यासाठी मोठ्या अवजड वाहनांची रेलचेल या मार्गावरुन दिवसभर असते. त्यामुळे या मार्गावरील पुलाचे महत्व अधिक आहे. हे जुने पूल निर्लेखित करून त्यठिकाणी उंचीसाहित नवीन पूल व्हावे, अशी मागणी येथील दाभिल, सरमळे आणि दशक्रोशीतील ग्रामस्थांनी मागणी लावून धरली होती.
---------
चौकट
असे आहे पूल
दाभिल नदीवरील या पूलाची लांबी ४० मीटर असून रुंदी १२ मीटर आहे तर उंची सुमारे ६ ते ७ मीटर असणार आहे. अखेरीस बऱ्याच वर्षानंतर का होईना, या पुलाला २ कोटी ३२ लाख ८९ हजार मंजूर झाल्याने पुलाच्या नूतन बांधणीचा प्रश्न निकाली लागला आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरीस या पुलाचे काम पूर्णत्वास जाणार आहे.