
पावस-गणेशगुळ्यातील लोखंडी साकव कोसळला
फोटो ओळी
-rat१३p८.jpg 75219
ः पावस ः : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे फडकेवाडी व गावकरवाडीदरम्यान नदीवरील लोखंडी साकव मध्यरात्री कोसळला.
----------------
गणेशगुळ्यातील लोखंडी साकव कोसळला
२५ वर्षांपूर्वीचा साकव ; पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास गैरसोय
पावस, ता. १३ ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे फडकेवाडी व गावकरवाडी यांना जोडणारा लोखंडी साकव ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्यामुळे कोणतीही दुरुस्ती होऊ न शकल्याने अखेर मध्यरात्रीला कोसळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गणेशगुळे गावातील फडकेवाडी व गावकरवाडी या दोन वाडींना जोडण्यासाठी व पावसाळ्यामध्ये होणारी अडचणीमुळे साकव कार्यक्रमांतर्गत २५ वर्षांपूर्वी लोखंडी साकव तयार करण्यात आला. त्यामुळे पावसाळ्यामध्ये या दोन वाडींना जोडण्याचे काम करण्यात आले. शासनाचा निधी बांधकामासाठी खर्ची पडल्यानंतर पुढील जबाबदारी त्या अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीची असते. या ग्रामपंचायतींवरती पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, जिल्हा परिषद, अध्यक्ष हे शिवसेनेचे असूनही गेल्या १०-१५ वर्षांमध्ये त्याच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करून दिला नसल्याने तसेच त्याच्या रंगरंगोटीची व दुरुस्तीचे कामे न केल्यामुळे अखेर तो लोखंडी साकव मध्यरात्री कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. पावसाळ्यापूर्वी या ठिकाणी नवीन साकव तयार न केल्यास या दोन्ही वाडींची पावसाळ्यामध्ये गैरसोय होण्याची शक्यता आहे.