
गुहागर-कोतळूकमधील क्रिकेट स्पर्धेत राजा हिंदुस्थानी संघ विजेता
कोतळूकमधील क्रिकेट स्पर्धेत
राजा हिंदुस्थानी संघ विजेता
गुहागर, ता. 13 ः राजा हिंदुस्थानी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोतळुक उदमेवाडी आयोजित गोपाळकृष्ण गोखले क्रीडानगरीत पार पडलेल्या (कै.) मारुती बंधू आडाव स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेत यजमान राजा हिंदुस्थानी कोतळुक संघाने विजेतेपद पटकावले, तर विरा आबलोली संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
गुहागर तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या एक ग्रामपंचायत रत्नागिरी जिल्हा मर्यादित टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्या राजा हिंदुस्थानी कोतळुक संघाला रोख रक्कम 33 हजार, चषक, उपविजेत्या विरा आबलोली संघाला रोख रक्कम 22 हजार व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर कोतळुक संघाचा साहिल मोहिते, फलंदाज अनू आरेकर, अंतिम सामना सामनावीर शुभम महाडीक, गोलंदाज विरा आबलोलीचा राजला चषक देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेत मास्टर अविनाश नरवण संघाच्या साहिल जाधव याने अर्धशतक तर विकेटची हॅट्ट्रिक गुरूकृपा पालशेत संघाचा राजकिरण बोले यांनी घेतली. बक्षीस वितरण समारंभाला ओबीसी आघाडी भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे आदी उपस्थित होते.