''ऑलम्पिक''मध्ये पूर्वाची चमकदार कामगिरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''ऑलम्पिक''मध्ये पूर्वाची चमकदार कामगिरी
''ऑलम्पिक''मध्ये पूर्वाची चमकदार कामगिरी

''ऑलम्पिक''मध्ये पूर्वाची चमकदार कामगिरी

sakal_logo
By

७५३३६
पुणे ः दोन सुवर्ण पदकांसह पूर्वा गावडे.

महाराष्ट्र ऑलम्पिकमध्ये
पूर्वाची चमकदार कामगिरी
जलतरणात सांघिक दोन सुवर्ण तर वैयक्तिक ब्रॉन्झ
ओरोस, ता. १३ ः पुणे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये झालेल्या महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिने चमकदार कामगिरी करत जलतरण स्पर्धेत सांघिक दोन सुवर्ण आणि दोन ब्रॉन्झ पदके पटकावली. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी तिचे कौतुक केले आहे.
पूर्वाने ४ बाय २०० मीटर रिले आणि वॉटर पोलोमध्ये दोन सुवर्ण पटकावली. ८०० व १५०० मीटर फ्री स्टाईलमध्ये दोन ब्रॉन्झ पटकावली. यापूर्वीही पूर्वाने राज्य व राष्ट्रीय पातळीवर पदके मिळविली आहेत. जलतरण क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे याचे तिला मार्गदर्शन आहे. पूर्वा पुणे क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. त्याच ठिकाणी दहावीचे शिक्षणही घेत आहे.