चिपळूण ः सीईओंनी दिले गणिताचे धडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  सीईओंनी दिले गणिताचे धडे
चिपळूण ः सीईओंनी दिले गणिताचे धडे

चिपळूण ः सीईओंनी दिले गणिताचे धडे

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl138.jpg ःKOP23L75335 चिपळूण ः मुलांना गणिताचे धडे देताना सीईओ कीर्तीकिरण पुजार.
-------------

सीईओंनी दिले विद्यर्थ्यांना गणिताचे धडे

कुशिवडेतील शाळेला भेट; शिक्षकांना अद्यापनाबाबत सूचना
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण तालुक्यात विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंनी अचानक कुशिवडे शिगवणवाडी जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. त्यांनी तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्याना गणिताचे धडे दिले. विद्यार्थी गणिते अचूकपणे सोडवतात की नाही याचीही चाचपणी केली. ऐनवेळी सीईओंनी घेतलेल्या परीक्षेत चाणाक्ष विद्यार्थी पास झाले. त्यांच्या हुशारीचे कौतुक करत शिक्षकांच्या अध्ययनाकडे नियमित लक्ष ठेवण्याची सूचना केली.
तालुक्यात शासकीय कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आलेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांची कुशिवडे शिगवणवाडी शाळेची भेट अनोखी ठरली. कुशिवडे ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर सीईओंचा ताफा शिगवणवाडी शाळेकडे वळला. सीईओंनी शाळेची, पटसंख्या, कार्यरत शिक्षकांची माहिती सांगितली. ओझ्याविना शाळा, ज्ञानरचनावादावर आधारित विविध उपक्रम, इंग्रजी वाचनासाठी लीप फॉरवर्ड, साफसफाई व स्वच्छता, परसबाग आदी उपक्रम राबवत असल्याचे मुख्याध्यापिका मनिषा कनव यांनी सांगितले.
शाळेच्या कार्यालयात लावलेले तिरंगी बिल्ले पाहिले. बिल्ले कोणी बनवले या विषयीची घेतली असता ते शाळेतील उपक्रमाअंतर्गत मुलांकडून बनवून घेतल्याचे सांगण्यात आले. शाळेची मुख्यमंत्री निधी शिगवण हिने पुष्पगुच्छ देत अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांना फळ्यावर बेरीज, वजाबाकी यांची उदाहरणे स्वत: सीईओंनी लिहून देत सोडवण्यास सांगितले. मुलांनी पटापट उदाहरणे सोडवून दाखवली. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला व्हेरी गुड, गुड असा शेरा देत कौतुक केले. काही मुलांना ठोकळ्यांपासून वाक्य बनवून ती वाचण्यास सांगितली. मुलांनी ती वाक्ये वाचली; पण त्यातील प्रत्येक शब्द कुठे आहे याची त्यांनी विचारून पडताळणी केली. या वेळी गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील, उपसरपंच सिद्धार्थ कदम, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.