
जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी केली गाळ उपशाची पाहणी
rat१३४७.txt
(पान ३ साठी मेन)
फोटो ओळी
-rat१३p२९.jpg-
७५३६३
चिपळूण ः वाशिष्ठी नदीपात्रात साठलेला गाळ व सुरू असलेल्या कामाची पाहणी करताना चिपळूण बचाव समिती व जलसंपदा अधिकारी
----
वाशिष्ठी नदीपात्रातील गाळ उपशाची पाहणी
जलसंपदा अन बचाव समिती ; संथ गतीवर आक्षेप
सकाळ वृत्तसेवा ः
चिपळूण, ता. १३ ः चिपळूण बचाव समिती व जलसंपदा अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे शुक्रवारी वाशिष्ठी नदीपात्रातील गाळाची पाहणी केली. या वेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा करून पुढील कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उक्ताड ब्रीजजवळ साठवून ठेवलेला गाळ, गोवळकोट येथील जॅकवेलपासून धक्क्यापर्यंतचा गाळ, गोवळकोट चरापासून दोन्ही पात्रांना जोडणारा कालवा, पेठमाप या ठिकाणांची पाहणी करण्यात आली.
वाशिष्ठी नदीतील गाळ उपशाचे काम सुरू असले तरी ते अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे चिपळूण बचाव समितीने आग्रही भूमिका घेत उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने या संदर्भात तातडीने हालचाल करत बचाव समितीबरोबर गुरुवारी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करताना जलसंपदा अधिकारी व बचाव समिती संयुक्तपणे कामाची पाहणी करेल व पुढील कार्यवाही केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी बचाव समिती सदस्य व जलसंपदा अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन संपूर्ण नदीपात्राची पाहणी केली.
या वेळी संबधित ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या वेळी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, विपुल खोत बचाव समितीचे सदस्य बापू काणे, अरूण भोजने, महेंद्र कासेकर, नदीचे समन्वयक शहानवाज शहा उपस्थित होते.
----
पुढील कामाचे नियोजन
गेल्या वर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर येथील काढलेला भला मोठा गाळ उचलणे शक्य नव्हते. गाळ टाकण्यासाठी तशी जागाही उपलब्ध नव्हती. यामुळे हा गाळ तिथेच ठेवण्यात आला होता; मात्र नदीपात्राच्या मध्यभागी ठेवलेला हा गाळ भविष्यातील पुराला कारणीभूत ठरू शकतो. यामुळे तो साठवलेला गाळ पूर्णपणे काढून टाकावा, अशी सूचना करण्यात आली. तसेच पुढील कामाचे नियोजनदेखील बचाव समितीसमोर स्पष्ट करण्यात आले.