सदर सागवे कात्रादेवी जत्रा

सदर सागवे कात्रादेवी जत्रा

Published on

rat१४१२.txt

( पान ६)

(८ जानेवारी पान नंबर सहा)

आख्यायिकांचे आख्यान ः लोगो

rat१४p१.jpg ः
७५४२३
धनंजय मराठे

rat१४p५.jpg -
७५४३४
अस आडं बनवतात

राजापूर तालुक्यातील सागवे येथील कात्रादेवी हे भाविकांचे श्रद्धास्थान. असंख्य ठिकाणाहून भाविक या ठिकाणी कात्रादेवी देवीच्या दर्शनाला येत असतात. हे ठिकाण जाज्वल्य. जत्रेआधी सात दिवस उत्सवाला सुरवात होते. विविध धार्मिक कार्यक्रम सात दिवस होतात. कात्रादेवी आपल्या बहिणींसह या भागात फिरत असताना त्या विखुरल्या गेल्या. यातील काही याच भागात असल्याची श्रद्धा आहे. कात्रादेवीने आपले वास्तव्य याच भागात केले. भाविकांनी देवीकडे मंदिर बांधण्यासाठी परवानगी मागितली असता देवीने एका दिवसात मंदिर बांधण्याची अट घातली. या अटीमुळे मंदिर होऊ शकले नाही. देवीने अखेर त्याच गावातील गुरवांच्या घरी वास्तव्य केलं आणि आजही जत्रेव्यतिरिक्त ही देवी गुरव मंडळींच्या घरी विराजमान असते.

धनंजय मराठे, राजापूर
----

बहिणी विखुरल्या, कात्रादेवी राहली गुरवांच्या घरी

कात्रादेवीची जत्रा पौष वद्य सप्तमीला असते; पण पौष पोर्णिमेपासूनच या जत्रेच्या धार्मिक कार्याला सुरवात होते. कात्रादेवी, सागवे गावात रामेश्वर, आकारी, विमलेश्वर, पावणाई अशी अनेक मंदिरे आहेत. पौर्णिमेदिवशी कात्रादेवीच्या मूर्तीला वाजतगाजत पावणाई देवीच्या देवळात आणण्यात येतं. गुरव मंडळी या ठिकाणी देवीला कौल लावतात. गाऱ्हाणे घालतात. देवीचा कौल झाला की शेजारी असलेल्या (ओंकारेश्वर मंदिरात) आकारी मंदिरात ओंकारेश्वराला कौल लावला जातो. कात्रादेवी आपल्या मूळजागी परत जाते. कौल मिळताच वाडीतील वंश परंपरेने चालत आलेल्या पातले घराण्यातील मंडळीपैकी उपस्थित एकाच्या अंगात वारं येतं. अंगात आलेल्या वाऱ्याला अवसर म्हणतात. तो तोंडाने हूं हूं असा आवाज करत हातात कोयती घेऊन अंधारातून धावत धावत कात्रादेवीच्या वाडीवरील वस्तीस्थानी येतो. कात्रादेवीच्या स्नानाचे न्हावण त्याच्या अंगावर शिंपडले जाते. न्हावण शिंपडताच त्याच्या अंगातील अवसर, वारं निघून जाते.
यात्रेआधी तीन दिवस खेंगरं म्हणून चिता रचण्याचा कार्यक्रम असतो. पहाटे अवसर रानात हाडं शोधण्यासाठी जातो. देवीला चितेमध्ये हाडं अर्पण करण्याची परंपरा आहे. हे हाड देवीला फुरसे चावून मेलेल्या किंवा बाळंतपणात मृत झालेल्या बाईचे असावे ही श्रद्धा अन आख्यायिकाही. हाड शोधण्यासाठी हा अवसर रानात जातो.

धार्मिक विविध कार्यक्रमांमुळे गावात उत्साहाचे वातावरण अधिकच उत्साहात असतं. जत्रेआधीच्या एक दिवस जत्रा भरते त्या ठिकाणी एक गडगा आहे तिथं आडं ठेवण्याचा कार्यक्रम असतो. आडं म्हणजे उत्सवापुरतं, तात्पुरतं देवीचे मंदिर बांधण्याचा कार्यक्रम. जंगलातील किंवा स्वखुशीने भाविकांनी दिलेलं एक जाडजुड झाडाची निवड केली जाते. गावातील सुतारमंडळी त्या झाडाला आढ्याचा आकार देतात. वाजतगाजत ते आढं यात्रेठिकाणी आणले जाते. पहिलं गतवर्षीचे गडग्यावरील आढं बाजूला करून नवीन आढं त्या ठिकाणी ठेवलं जातं. आढ्यावर माडाची झापं लावून मंदिरसदृश सजावट केली जाते. यात्रेदिवशी पहाटे देवीला गाऱ्हाणे जाब दिला जातो. जाब दिल्यावर पुन्हा त्याच माणसाच्या अंगात अवसर येतं आणि तो रानात कुठे जातो ते कोणालाच माहीत नाही आणि कोणी शोधतही नाही.
जत्रेच्या दिवशी म्हणजेच पौष वद्य सप्तमीला रात्री १२ वा. जत्रा असते त्या ठिकाणी देवीला गाऱ्हाणे, जाब दिला जातो. गाऱ्हाणे, जाब दिला की, परत तो अवसर रानात ज्या ठिकाणी असेल तेथून तो दगडधोंड्यातून धावत धावत जत्रेच्या ठिकाणी येतो आणि त्याच्या मनगटाला बांधलेले त्याने शोधून आणलेले हाड चितेमध्ये टाकतो आणि जत्रेची समाप्ती होते. या सड्यावर अनेक विखुरलेले दगड असतात त्या खाली विषारी फुरसे, विंचू इ. विषारी असूनही कोणाला आजपर्यंत दंश झालेला नाही; मात्र जत्रा झाली भाविक तेथून गेले ती त्या विस्तीर्ण सड्यावर अनेक फुरशी, विंचू मात्र मृतावस्थेत आढळतात.

(लेखक संस्कृती आणि निसर्ग याचे अभ्यासक आहेत.)

---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com