पाट येथील हायस्कूलचे मैदानी स्पर्धेमध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाट येथील हायस्कूलचे
मैदानी स्पर्धेमध्ये यश
पाट येथील हायस्कूलचे मैदानी स्पर्धेमध्ये यश

पाट येथील हायस्कूलचे मैदानी स्पर्धेमध्ये यश

sakal_logo
By

75450
माड्याचीवाडी ः पाट हायस्कूलच्या खेळाडूंना गौरविताना मान्यवर.

पाट येथील हायस्कूलचे
मैदानी स्पर्धेमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः माध्यमिक विद्यालय, नेरुर-माड्याचीवाडी येथे झालेल्या राधारंग आयोजित मैदानी स्पर्धेत पाट हायस्कूलने यश मिळविले.
माध्यमिक विद्यालय, नेरुर-माड्याचीवाडी येथे राधारंग फाउंडेशनतर्फे मैदानी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत पाट विद्यालयाने चॅम्पियनशिपसाठी असलेली शारदा ट्रॉफी मिळविली. यात मुलींमध्ये १०० मीटर धावणे-वेदश्री ठाकूर (प्रथम), ४०० मीटर धावणे-आकांक्षा कुंभार (प्रथम), लांब उडी (द्वितीय क्रमांक), थाळी फेक-दीक्षा मराळ (द्वितीय), भालाफेक-हेमांगी मेतर (द्वितीय), गोळा फेक-हेमांगी मेतर (द्वितीय) यांनी यश मिळविले. तर मुलांमध्ये १०० मीटर धावणे-सोमाजी राऊळ (द्वितीय), थाळीफेक-भावेश शिरोडकर (प्रथम), भालाफेक-भावेश म्हापणकर (प्रथम) यांनी यश मिळवित राधारंग स्पर्धेत ठसा उमटविला. सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक राजन हंजनकर, संजय पवार, दत्तात्रय कुबल यांचे मार्गदर्शन लाभले. प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रके व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व खेळाडूंचे संस्था उपाध्यक्ष डी. ए. सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, संस्था पदाधिकारी देवदत्त साळगावकर, सर्व पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी गुरुनाथ केरकर, ज्येष्ठ शिक्षक सयाजी बोंदर यांनी अभिनंदन केले.