
...आता रस्ते विषयावरून उठवता येणार नाही रान
rat1422.txt
(पान 5 साठी मेन)
...आता रस्त्यांवरून रान उठवता येणार नाही
96 कोटी मंजुर ; रत्नागिरीतील विरोधकांना उत्तर
सकाळ वृत्तसेवा ः
रत्नागिरी, ता. 14 : रस्ता खराब झाला, पावसात पुन्हा रस्त्यात खड्डे पडले, रस्ते म्हणजे शहराचा विकास आहे का? अशा तक्रारी करण्यास आता विरोधकांना संधी मिळणार नाही. कारण निविदा प्रक्रिया झाल्यानतंतर लवकरच शहरामध्ये 96 कोटी रुपये खर्च करून सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते केले जाणार आहेत. 30 वर्षे टिकतील एवढी त्या रस्त्यांची गुणवत्ता असणार आहे. 10 कि.मी. पर्यंतच्या रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण कार्यारंभ आदेशापासून दीड ते दोन वर्षांत पूर्ण करण्याची मुदत असणार आहे. त्यामुळे भविष्यात विरोधकांना रस्त्यांच्या विषयावरून रान उठवता येणार नाही, असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी दिला.
पंडित म्हणाले, शहरातील रस्त्यांवरचे खड्डे बुजवणे किंवा साईडपट्ट्या कामासाठी दरवर्षी 25 ते 30 लाख रुपये पालिकेला खर्च करावे लागतात. मुसळधार पावसात रस्त्यांवरचे डांबरीकरण टिकत नाही. त्यामुळे विरोधकांना खराब रस्त्यांचा मुद्दा दरवर्षी धगधगता ठेवता येतो. यातून सत्ताधाऱ्यांवर डांबरीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही केला जातो. अशा वेळी टिकावू रस्ते होऊन कोणत्याही सत्ताधाऱ्यांवर नागरिकांसह विरोधकांचा रोष उद्भवू नये यासाठी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य योजनेतून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसाठी 96 कोटी रुपये पालिकेला उपलब्ध करून दिले आहेत. शहरातील साळवी स्टॉप, दांडा फिशरीज, नाचणे रोड, चर्मालय, थिबा पॅलेस रोड आदी ठिकाणी एकूण 10 कि.मी.चे रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे.
शासनाकडून 96 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून 10 टक्के म्हणजे सुमारे 14 कोटी पालिकेला भरावा लागणार आहे. हा हिस्सा टप्प्याटप्प्यान संबधित ठेकदाराना कामाची बिले अदा करताना भरावा लागणार आहे. एकाचवेळी 14 कोटी रुपये द्यायचे नसल्याने पालिकेला आपला हिस्सा देताना अडचणी येण्याची शक्यता नाही. सध्या पालिका आर्थिक अडचणीत असल्याने हा हिस्सा पालिकेला कसा पेलवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. सध्याचे रस्ते 24 मीटरचे असून ते काँक्रिटीकरणात 14 मीटरचे होणार आहे. साईडपट्ट्यांच्या ठिकाणी वेगवेगळ्या वाहिन्या स्थलांतरित केल्या जाणार आहेत. या रस्ता कामाचा निधी प्राप्त झाला असून प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे त्यानी सांगितले.
..
वाहिन्या स्थलांतरित करण्याची गरज
शहरात ज्या ठिकाणी सिमेंट काँक्रिटचे रस्ते केले जाणार आहेत, त्या ठिकाणच्या रस्त्याखाली असलेली जलवाहिनी, वीज वाहिनी, वायू वाहिनी रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्याचे अंदाजपत्रकही या सिमेंट काँक्रीटच्या रस्ता कामात अंतर्भूत आहे. सर्वच ठिकाणच्या या वाहिन्या स्थलांतरित करण्याची गरज नसल्याने पाणी, गॅस, वीज वाहिनीची समस्या दीर्घकाळ राहणार नाही. एकूण 10 कि.मी. च्या रस्ता कामातील दीड ते दोन कि.मी. अंतरातील या वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.
-----
शहराचा शास्वत विकास होईल...
उद्योग मंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत हे जे काही करतील ते चांगलेच करतील. शहराचा शास्वत विकास होईल. मुंबईच्या धर्तीवर अनेक यंत्रणा अंडरग्राऊंड (भुमिगत) करून शहरवासीयांना चांगल्या आणि दर्जेदार पायभुत सविधा मिळतील यामध्ये शंकाच नाही.
राहुल पंडित