उगवते तारे क्रीडा मंडळातर्फे क्रीडा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उगवते तारे क्रीडा मंडळातर्फे क्रीडा महोत्सव
उगवते तारे क्रीडा मंडळातर्फे क्रीडा महोत्सव

उगवते तारे क्रीडा मंडळातर्फे क्रीडा महोत्सव

sakal_logo
By

उगवते तारे क्रीडा मंडळातर्फे क्रीडा महोत्सव
आकर्षक बक्षीसे ; आज पारितोषिक वितरण
पावस, ता. १४ः राजापूर तालुक्यातील उगवते तारे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा मंडळ हातदेच्यावतीने ३५ व्या क्रीडा महोत्सवानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात विविध लोकोपयोगी कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याअंतर्गत तीन दिवस चालणाऱ्या क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे.
या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन संदीप बारस्कर, अप्पा साळवी, सुधाकर देसाई यांच्या हस्ते झाले. रमाकांत बाळकृष्ण चव्हाण, खुशीराम मोरे, राजाराम मोरे, संजय सुतार, सुरेश मोरे, सुरेश ऐनारकर, जितेंद्र खामकर, संजय पाटेकर, स्वप्नील खानविलकर आदि मंडळींच्या उपस्थितीत स्पर्धा सुरू झाल्या. या स्पर्धेचे बक्षीस वितरण १५ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता अरूण शिरसाट, अशोक चव्हाण, उद्योजक किरण सामंत, राष्ट्रवादीचे युवा नेते अजित यशवंतराव, विजय चव्हाण आदींच्या उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास अरूण शिरसाट यांच्याकडून २५ हजार रूपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास पोलीस अधिकारी अरूण चव्हाण यांच्याकडून १५ हजार रूपये तसेच तृतीय क्रमांकास प्रभाकर देसाई यांच्याकडून दहा हजार रूपये अशी बक्षिसे ठेवली आहेत. स्पर्धेचे नियोजन अध्यक्ष जयप्रकाश चव्हाण, सेक्रेटरी रमाकांत चव्हाण, खजिनदार संदीप राणे, कार्याध्यक्ष राजेश चव्हाण यांनी केले आहे.
तसेच श्रीरामेश्वर रवळनाथ रंगमंच, होळीचा मांड येथे परिसरातील कलाकारांच्या कलेला वाव मिळावा, यासाठी भव्य ग्रुप, सोलो व लावणी डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर १५ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत तांबटीचा माळ स्टेडियम येथे तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे. शिवाय शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय वस्तूंचे वाटप, वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.