
कोकण रेल्वेचे जनक अ. ब. वालावलकर
कोकण आयकॉन
---
टीपः swt१४३३.jpg मध्ये फोटो आहे.
सतीश पाटणकर
टीपः swt१४३४.jpg मध्ये फोटो आहे.
अ. ब. वालावलकर
--
कोकण रेल्वेचे जनक
अ. ब. वालावलकर
कोकण रेल्वेच्या संकल्पनेचे जनक कोकणचे सुपुत्र कुडाळ तालुक्यातील वालावलचे रहिवासी (कै.) अ. ब. वालावलकर हे होत. त्यांनी कोकण रेल्वेची संकल्पना केवळ मांडलीच नाही, तर वर्तमानपत्रांतून सातत्याने लेख लिहून आणि कोकण रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करून ती कोकणवासीयांमध्ये रुजविली. तत्पूर्वी कोकणातील डोंगरदऱ्या, नद्या, अवघड मार्ग, मुसळधार पाऊस यातून कधी कोकणात रेल्वे येईल, असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते.
- सतीश पाटणकर
..............
अ. ब. वालावलकर हे सेंट्रल रेल्वेमध्ये इंजिनिअर होते. त्यांनी कोकण रेल्वेची संकल्पना केवळ मांडलीच नाही, तर वर्तमानपत्रातून सातत्याने लेख लिहून आणि कोकण रेल्वेची माहिती देणारी पुस्तिका प्रकाशित करून ती कोकणवासीयांमध्ये रुजविली. तर भारताच्या पहिल्या लोकसभेत कोकण रेल्वेची मागणी करणारे पाहिले भाषण त्या काळात रत्नागिरी लोकसभा मतदार संघातून लोकसभेत निवडून गेलेले काँग्रेसचे खासदार स्वातंत्र्यसैनिक अॅड. मोरोपंत जोशी यांनी केले होते.
१९५७ ते १९७० या कालावधीत सलग तीन वेळा राजापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले समाजवादी नेते बॅ. नाथ पै यांनी सातत्याने कोकण रेल्वेचा पाठपुरावा लोकसभेत चालविला होता. १९६९ साली काँग्रेसचे विभाजन होऊन जुन्या उजव्या विचारांच्या मंडळींनी संघटना काँग्रेस स्थापन केली. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सरकार लोकसभेत अल्पमतात गेले. या संधीचा फायदा घेऊन बॅ. नाथ पै यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रेल्वेच्या अर्थसंकल्पात ‘कोकणात रेल्वेच्या सर्वेक्षणासाठी तरतूद नाही’ या कारणास्तव एक रुपयाची कपात सूचविली होती. संसदीय प्रथेमध्ये एक रुपयाच्या कपात सूचनेला इतके महत्त्व आहे, की ती मंजूर झाल्यास तो सत्तारुढ पक्षाच्या मंत्रिमंडळावर अविश्वास मानला जाऊन मंत्रिमंडळास राजीनामा द्यावा लागतो; परंतु संघटना काँग्रेसच्या खासदारांनी या कपात सूचनेवर तटस्थता स्वीकारल्याने ही कपात सूचना नामंजूर झाली. धूर्त इंदिरा गांधी या घटनेने सावध झाल्या. त्यांनी बॅ. नाथ पै यांना बोलावून त्यांचा विचार काय आहे हे जाणून घेतले आणि तत्काळ कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले.
पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे जिकीरीचे काम होते; पण मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या मंत्र्यांमुळे कोकण रेल्वे धावू लागली. पंचवीस वर्षांपूर्वी कोकण रेल्वेचे आपले स्वप्न आपल्या हयातीत साकार झालेले आपणास पाहावयास मिळेल, असे कोणाही कोकणवासीयास वाटले नव्हते; पण बॅ. नाथ पै, प्रा. मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या समाजवादी नेत्यांच्या प्रयत्नांमुळे हे स्वप्न साकार झाले. कोकणातून २० मार्च १९९३ मध्ये कोकण रेल्वेची पहिली गाडी धावली. पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे हे जिकीरीचे काम होते; पण मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडीस या मंत्र्यांमुळे कोकण रेल्वे धावू लागली आणि तिचे रौप्यमहोत्सवी वर्ष यंदापासून सुरू झाले. या २५ वर्षांत कोकण रेल्वेने अनेक प्रगतीचे टप्पे गाठले. कोकण रेल्वेच्या संकल्पनेचे जनक कोकणचे सुपुत्र कुडाळ तालुक्यातील वालावलचे रहिवासी (कै.) अ. ब. वालावलकर हे होत. वालावलकर हे जॉर्ज इंग्लिश स्कूलमध्ये अ. वा. मराठे यांचे विद्यार्थी होते. त्यांच्याच प्रेरणेने ते पुढे लेखन करू लागले. पुढे रेल्वेखात्यात नोकरीला लागल्यानंतर त्यांनी अनेकदा अनेक वृत्तपत्रांतून लेखन केले. कोकण रेल्वेचा आराखडा आणि कोकण रेल्वेची आवश्यकता याविषयी त्यांचे अभ्यासपूर्ण लेख सर्वप्रथम अनेक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी अनेकांनी त्यांच्या लिखाणाची खिल्ली उडवली होती; पण केंद्राने जेव्हा कोकण रेल्वेला हिरवा कंदील दाखविला, त्यावेळी दस्तुरखुद्द दंडवतेंनी आबा वालावलकर यांनाच त्याचे सारे श्रेय दिले. १९२२ मध्ये त्यांनी कोकण रेल्वेवर पहिली पुस्तिका प्रकाशित केली. त्यांनी कोकण रेल्वेवर अनेक परिसंवाद आणि विविध राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील वृत्तपत्रांतून लिखाण केले.
(लेखक मुख्यमंत्रांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)