देवगडमध्ये ज्येष्ठ महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये ज्येष्ठ महिलांचा सन्मान
देवगडमध्ये ज्येष्ठ महिलांचा सन्मान

देवगडमध्ये ज्येष्ठ महिलांचा सन्मान

sakal_logo
By

75644
जामसंडे ः येथे राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)

देवगडमध्ये ज्येष्ठ महिलांचा सन्मान

भाजपचा पुढाकार; राजमाता जिजाऊंना अनोखे अभिवादन

देवगड, ता. १५ ः येथील तालुका भाजप महिला मोर्चातर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती जामसंडे येथे आगळयावेगळ्या पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक वेश परिधान करून महिलांनी कार्यक्रम सादर केला. यावेळी काही ज्येष्ठ महिलांचा सन्मान करण्यात आला.
जामसंडे येथील टिळक स्मारक सभागृहात आयोजित कार्यक्रमावेळी मंचावर लक्ष्मी खवळे, रजनी कांदळगावकर, वैशाली तोडणकर, शुभांगी कदम, प्राची मेस्त्री आदी उपस्थित होत्या. पारंपरिक वेश परिधान केलेल्या महिलांनी प्रतिमापूजन केले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. यावेळी काही ऐतिहासिक संदर्भ देत जिजाऊंविषयी माहिती देण्यात आली. शरयू ठुकरूल, प्राजक्ता घाडी, तन्वी शिंदे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, महिला तालुकाध्यक्षा उषःकला केळुसकर आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजिका नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी जिजाऊंबाबत माहिती दिली. मनस्वी घारे यांनी गीत सादर केले. निमंत्रित महिलांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन नगरसेविका प्रणाली माने यांनी केले. यावेळी त्यांनीही जिजाऊंबाबत मार्गदर्शन केले. आभार सीमा लंगोटे यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, नगरसेविका रुचाली पाटकर, श्‍वेता शिवलकर, सायली पारकर, ललिता पेडणेकर यांच्यासह अन्य महिला तसेच योगेश चांदोस्कर, उमेश कणेरकर, नगरसेवक शरद ठुकरूल आदी उपस्थित होते.