चिपळूण-संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-संक्षिप्त
चिपळूण-संक्षिप्त

चिपळूण-संक्षिप्त

sakal_logo
By

पान ५ साठी, संक्षिप्त

अॅबॅकस स्पर्धेत प्रोऍक्टिव्ह अॅकॅडमीचे यश
चिपळूण ः प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल ऑनलाईन कॉम्पिटिशन २०२२-२३ (साऊथ झोन) या स्पर्धेत कावीळतळी येथील प्रोऍक्टिव्ह अॅबॅकस अॅकॅडमीतील विद्यार्थिनी ईश्वरी दिग्विजय कोटकरने हिने लेवल ३ मध्ये प्रथम क्रमांकाची ट्रॉफी पटकावली. लेवल २ मध्ये युसुफ मोसीम निवसेकरने द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मिळवली. लेवल ४ मध्ये वरद संदीप कदमने तृतीय क्रमांक पटकावून ट्रॉफी मिळवली. या तिन्ही विद्यार्थ्यांची निवड पुणे येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी झाली आहे. ६ मिनिटांत १०० गणिते सोडवायची होती. सदर स्पर्धेत विविध विभागातील ९५० विद्यार्थी सहभागी झाले होते. लेवल १ मध्ये लावण्या गणेश जोशी, लेवल २ मध्ये यश काकासाहेब रानखांब, कैवल्य कैलास कोटकर, लेवल ४ मध्ये वल्लभ सचिन गायकवाड, आर्या काकासाहेब रानखांब, लेवल ५ मध्ये मेहविश अलम तांबे व लेवल ७ मध्ये अनन्या गणेश जोशी यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या सर्व विद्यार्थाना अबॅकस अकॅडमीच्या संचालिका कुमुदिनी खेराडे व धनश्री खेराडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

मातृमंदिर आयटीआयमध्ये रस्ता सुरक्षा प्रबोधन
साडवली : देवरूख येथील मातृमंदिर संचलित इंदिराबाई बेहरे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. तरुणांच्या हातात वाहनांची संख्या वाढते आहे; परंतु हा वापर वाढत असतानाच वाहन चालक म्हणून जबाबदारीची जाणीव मात्र फार कमी युवकांमध्ये दिसून येते. अशा वेळी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी, हेल्मेटची गरज याबाबत कायदे सोप्या भाषेत सांगण्यात आले. कार्यक्रमासाठी श्री. साळुंखे व त्यांचे सहकारी श्री. खाडे यांनी आयटीआयच्या विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिरात भूगोल दिन
पावस ः येथील स्वामी स्वरूपानंद विद्या मंदिरमध्ये भूगोल दिन साजरा करण्यात आला. प्रास्ताविक ओंकार प्रसादे यांनी केले. त्यानंतर प्रा. बाबासाहेब माने यांनी भूगोल दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. डॉ. सी. डी. देशपांडे हे शिक्षक, लेखक व भूगोलतज्ञ होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे १४ जानेवारीला झाला. १९८८ पासून राष्ट्रीय पातळीवर त्यांचा जन्म दिवस हा भूगोल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यांनी भूगोल विषयाला स्वतंत्र शाखेची निर्मिती केली. कार्यक्रमाला सुरेखा जाधव पर्यवेक्षक काटे उपस्थित होते.