
चिपळूण-प्रणव गायकवाडला सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
-rat१५p२३.jpg-KOP२३L७५७८९ चिपळूण ः प्रणव गायकवाडला पुरस्कार देताना ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी.
-----------------
प्रणव गायकवाडला
सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार
चिपळूण, ता. १५ ः चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने कोकणातील विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्काराने सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रणव गायकवाडला गौरविण्यात आले. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २९ विद्यालयातील एक विद्यार्थी या पद्धतीने २९ विद्यार्थ्यांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
या सर्व विद्यार्थ्यांचा युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, डॉ. प्रसाद देवधर, मुख्याध्यापक राजेंद्र वारे, शरयू यशवंतराव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व एक हजार पाचशे रुपये (यामध्ये ५०० रुपयांची पुस्तके) देऊन गौरव करण्यात आला. झाडांची लागवड करणे, त्यांची जोपासना करणे, स्वच्छता राखणे असे गुण अंगिकारलेल्या प्रणवने विविध राज्यस्तरीय प्रश्नमंजूषा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला असून चित्रकलेच्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षेत यश प्राप्त केले आहे. प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये राज्यस्तरावर त्याने सहभाग नोंदवला आहे. या सर्व निपुणता विचारात घेऊन परीक्षकांनी त्याची या पुरस्कारासाठी निवड केली. प्रणव गायकवाडला सहाय्यक शिक्षिका सौ. गौरी शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले.