‘धर्मांतर बंदी’ कायदा त्वरित करा

‘धर्मांतर बंदी’ कायदा त्वरित करा

Published on

75757
बांदा ः येथे आंदोलनात सहभागी झालेले हिंदू बांधव. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

‘धर्मांतर बंदी’ कायदा त्वरित करा

‘हिंदू जनजागृती’; बांदा येथे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन

बांदा, ता. १५ ः येथील कट्टा कॉर्नर चौकात आज सकाळी हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित राष्ट्र आणि धर्मप्रेमी नागरिकांनी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ आणि ‘धर्मांतर बंदी’ हे कायदे त्वरित करावेत, अशी मागणी शासनाकडे केली.
यावेळी डेगवे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंत देसाई, इन्सुली येथील प्रिया नाटेकर, पडवे-माजगाव येथील स्वरदा देसाई, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक हेमंत मणेरीकर, शिवराम देसाई यांनी राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटांविषयी प्रबोधन केले. या आंदोलनात १०० हून अधिक राष्ट्र आणि धर्मप्रेमी सहभागी झाले होते. यावेळी देशातील धर्मांतर आणि ‘लव्ह जिहाद’ याबाबत सांगण्यात आले की, आर्थिक आमिषे, प्रलोभने, भावनिक जाळे आणि बळजबरी आदी अनेक माध्यमांतून गरीब आणि असाहाय्य हिंदूंचे धर्मांतर करण्यात येत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचे स्पष्टपणे म्हटले होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण आज घेत आहोत. १९९० मध्ये काश्मिरमधून सुमारे साडेचार लाख हिंदूंना हुसकावून लावण्यात आले. अद्याप हा प्रयत्न विविध स्तरांवर सुरूच आहे. ईशान्येकडील अनेक राज्यांत हिंदू अल्पसंख्य, तर ख्रिस्ती बहुसंख्यांक झाले आहेत. धर्मांतरामुळे देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाल्याने तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना संविधानानुसार जगणेही कठीण झाले आहे. एकूणच आमिष, प्रलोभने आणि बळजबरीने चालणारे हे धर्मांतराचे प्रकार संविधानाच्या विरोधात तर आहेच, शिवाय मानवतेलाही काळीमा फासणारे आहेत. हे एक मोठे राष्ट्रविरोधी षड्यंत्र आहे. त्यामुळे याविरोधात त्वरित कायदा केला पाहिजे. याविषयीचे निवेदन गृहमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यासाठी उद्या (ता. १६) सावंतवाडी तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com