नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार
नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

rat१६१५.txt

बातमी क्र..१५ (टुडे पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१६p५.jpg ः
७५८९९
लांजा ः नासा आणि इस्रो या संस्थांना भेट देण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
---
नासा, इस्रोला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

लांजा, ता. १६ ः कुणबी विकास सहकारी पतसंस्था व न्यू इंग्लिश स्कूलतर्फे नासा आणि इस्रो या संस्थांना भेट देण्यासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिरवली शाळेतील आशिष गोबरेने प्रथम क्रमांक पटकावला. त्याला अमेरिकेतील नासा व इस्त्रो या दोन्ही संस्थांना भेट देण्याचा मान मिळाला. या परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या वनगुळे नं. १ चा आर्यन गुरव व तृतीय क्रमांक मिळविणारी लांजा नं. ५ ची वेदिका वारंगे यांना इस्रो संस्थेला भेट देण्याची संधी लाभली आहे. या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिक, गौरवपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, न्यु एज्युकेशन सोसायटीचे संचालक महंमदशेठ रखांगी, कार्यवाह विजय खवळे, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक नंदकुमार आंबेकर, मुख्याध्यापिका विद्या आठवले, उपमुख्याध्यापक सुनील जाधव, पर्यवेक्षक भैरू सोनवलकर आदी उपस्थित होते.

---