सदर ः उडनेवाले का नाम - ड्रोन

सदर ः उडनेवाले का नाम - ड्रोन

Published on

rat१६२०.txt

(
१० जानेवारी टुडे तीन)

( टुडे पान ३ साठी)

टेक्नोवर्ल्ड ... लोगो

फोटो ओळी
-rat१६p१०.jpg -
७५९०६
प्रा. संतोष गोनबरे
---
आपल्या राष्ट्रीय भाषेत एक म्हण सध्या रूढ होऊ घातली आहे, ती म्हणजे ‘हवा में उडनेवाली हर चीज ड्रोन नही होती है’. आता तुम्ही म्हणाल ही कसली म्हण? तिला कसली आलीय परंपरा आणि औचित्य? मित्रहो, हवेत उडणारी कोणतीही गोष्ट या आधी आपण पक्षी समजायचो; पण मागील काही वर्षांत आकाशातील पक्षी गायब होत गेलेले आपण अनुभवतो आहोत; मात्र भिरभिरणाऱ्या तांत्रिक तबकड्या दृष्टिपथात येऊ लागल्या आहेत, त्या म्हणजेच ड्रोन. वेगवेगळ्या आकाराचे, उपयोगाचे आणि वजनाचे असे हे तांत्रिक उपयोगी अवजार म्हणजे भविष्यातील हवाई तंत्रज्ञानाच्या बहुपयोगाचा आकाश पादांक्रांत करणारा महत्त्वाचा प्रयोग. ड्रोन म्हणजे नेमके काय ते समजावून देणारा लेख ...

- प्रा. संतोष गोनबरे, चिपळूण
---

उडनेवाले का नाम ड्रोन

ड्रोन म्हणजे मानवरहित रिमोटच्या मदतीने नियंत्रित केले जाणारे हवाई वाहन होय. म्हणजे एक प्रकारचा दूर अंतरावरून नियंत्रित करता येणारा रोबोट समजा ना... सन १८४९ मध्ये ऑस्ट्रियन सैन्याने इटलीतील व्हेनिस शहराला घेराव घालण्यासाठी जवळपास दोनशे फुगे एकत्र करून काही हत्यारे इकडची तिकडे नेली. गरजेतून निर्माण झालेली ही कल्पना उचलून पुढे १९०३ सालात स्पॅनिश इंजिनिअर लिओनार्दो टोरेस क्युवेदा याने रेडिओ लहरींवर आधारित पहिले मानवाशिवाय संचलन करणारे हवाई जहाज म्हणजे छोटे विमान बनू शकते, याची शास्त्रीय मांडणी केली. त्या मांडणीचा विकास पुढे वेगवेगळ्या पद्धतीने १९१७ पर्यंत होत राहिला. निकोला टेस्ला याने १९१५ मध्ये मानवविरहित विमानाचे आरेखन केले. १९३५ मध्ये ब्रिटिश लष्करात ४०० छोट्या-छोट्या घोंघावणाऱ्या अशा विमानांचा ताफा सेवेसाठी सज्ज झाला; मात्र त्यांचा कुशलतेने वापर करणे अशक्य झाल्याने या ड्रोनची उपयुक्तता दुसऱ्या महायुद्धापर्यंत दुर्लक्षित राहिली. पुढे मात्र अमेरिका, रशिया, इस्रायल यांनी हे तंत्र मोठ्या प्रमाणात विकसित केले आणि २००२ नंतर याचे बाजारमूल्य वाढून आज अनेक खासगी कंपन्याही ड्रोन निर्मितीत अग्रेसर झाल्या आहेत.
ड्रोन शब्दाचा नेमका अर्थ माहित आहे का? ड्रोन म्हणजे परजीवी घ्यूं-घ्यूं.....करणारी नरमाशी. ही ड्रोनमाशी जास्त आकाशात वर उडत नाही. फक्त ठराविक अंतरावर घोंघावत राहते. रिमोटचा इशारा मिळाला की, काही अंतर दूर जाते आणि परत स्थिर होते. इथे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य केले जाते. ड्रोनचा बाह्यभाग गुरूत्वीय त्वरणाला केंद्रीय बिंदूतून विभागून टाकतो आणि वर जोडलेली छोटी छोटी पाती गरागरा फिरत राहून या इवल्याशा यंत्राला हवेत वर लोटत राहतात. त्यामुळे इलेक्ट्रिक सिग्नल्स देऊन हव्या त्या ठिकाणी ड्रोन घुमवता येतो. जीपीएस, सॉफ्टवेअर आणि रिमोट ही याची महत्वाची अंगे. रिमोटवर एक जॉयस्टिक नावाचा दांडा असतो जो पुढे-मागे फिरवला की दिशा आणि वेग यांचे संतुलन करता येते. ड्रोनचे अनेक प्रकार त्याच्या वजनानुसार ठरतात. अगदी २५० ग्रॅम ते १५० किलोचे ड्रोन आज वापरात आहेत. संरक्षण क्षेत्रात वापरले जाणारे ड्रोन आकाराने मोठे व अधिक क्षमतेचे असतात. या ड्रोनच्या मदतीने बॉम्बसुद्धा टाकता येतात.
ड्रोनचा परिणामकारक वापर सर्वप्रथम अमेरिकेने अफगाणिस्तानमधील तालिबान विरोधातील मोहिमेत केला. ऑनलाईन विक्री करणाऱ्या अमेझॉन डॉट कॉमने या ड्रोनचा वापर व्यावसायिक वापर करणार असल्याचे डिसेंबर २०१३ मध्ये जाहीर केले. त्यानुसार मुंबईत ड्रोनच्या मदतीने दीड किमी अंतरावर पिझ्झाची डिलिव्हरी देण्याचा प्रयोग झाला. हा अशाप्रकारचा देशातील पहिलाच प्रयोग होता. ड्रोन बनवण्यासाठी साधारण सव्वा लाख रुपये खर्च येतो; परंतु आठ किमीच्या पुढे उड्डाण केल्यास ड्रोनची बॅटरी रिचार्ज करावी लागते. सध्यातरी आठ किलोपेक्षा कमी वजन वाहून नेणारे हे यंत्रविमान व्यावसायिक बाजारपेठेत उपलब्ध आहे; मात्र ही मर्यादा भविष्यकाळात शिथिल होऊ शकते तसेच सुरक्षेच्या कारणामुळे ४०० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून ड्रोनचे उड्डाण करण्यास बंदी आहे. अमेरिकेत येत्या वर्षभरात ड्रोन विक्रीबाबत धोरण निश्चित करण्यात येणार आहे. भारतातही त्याचे धोरण ठरेल. येत्या चार-पाच वर्षात या प्रकारची ड्रोन सेवा बऱ्याच ठिकाणी वापरली जाऊ शकते.
ड्रोन तंत्रज्ञान तर भारतासाठी खूपच कामाचे आहे. वन्यजीव संरक्षण, शेतीतील फवारणी व पीक संगोपनसोबतच गणपती विसर्जन व कुंभमेळ्यासारख्या गर्दीच्या ठिकाणी हवाई गस्त घालण्यासाठी तसेच फोटोग्राफीसाठीही ते महत्वाचे ठरणार आहे. लघु, मध्यम, दीर्घ अशा पल्ल्यात या तंत्रज्ञानाचा वापर करता येतो. भारतीय बनावटीचा निशांत हा ड्रोन खूपच प्रसिद्ध आहे. शेती, वाहतूक, छायाचित्रण, घातपात, औषध आणि अन्नपुरवठा, आपत्तीकाळ आदी कामे करण्यासठी भविष्यात ड्रोन युग अवतरले तर आश्चर्य वाटायला नको. आज आपण टॅक्सी किंवा रिक्षा हात दाखवून थांबवतो किंवा स्वत:च्या वाहनाने गर्दीतून मार्ग काढत प्रवास करतो. उद्या कदाचित ‘हात दाखवा आणि ड्रोन थांबवा’ अशी योजना अस्तित्वात येईल आणि आपण हवाई उड्डाण करून नातेवाइकांना भेटायला जाऊ. आज गाडी किंवा मोबाईल सहजरित्या आपल्या मालकीचा होते. उद्या ड्रोनची मालकी मिळेल; पण एक लक्षात ठेवायलाच हवं शेवटी हे एक यंत्र आहे, मिळालेल्या इशाऱ्यावर चालणारे. ते हॅक करून अनैतिक कामासाठी वापरले जाणार नाही याची अजिबात खात्री देता येत नाही. त्याचे जेवढे सहज फायदे आहेत तेवढेच दूरगामी परिणामही आहेत. त्यामुळे भारत सरकारने २०१४ ऑक्टोबरमध्ये एक कायदा मंजूर करून परवानगीशिवाय ड्रोन उडवायला मज्जाव केला आहे. तरीही शेती आणि इतर क्षेत्रात या तंत्रज्ञानाचे खूप म्हणजे खूपच फायदे आहेत.
---

(लेखक ः महाविद्यालयात भौतिक शास्त्रातील प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com