आरोग्य अधिकारी संघटनेच्या संपाला सिंधुदुर्गातून पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य अधिकारी संघटनेच्या संपाला सिंधुदुर्गातून पाठिंबा
आरोग्य अधिकारी संघटनेच्या संपाला सिंधुदुर्गातून पाठिंबा

आरोग्य अधिकारी संघटनेच्या संपाला सिंधुदुर्गातून पाठिंबा

sakal_logo
By

swt168.jpg
75939
सिंधुदुर्गनगरी ः बीडीओ प्रजित नायर यांना निवेदन देताना आरोग्य अधिकारी संघटनेचे पदाधिकारी.

आरोग्य अधिकारी संघटनेच्या
संपाला सिंधुदुर्गातून पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ः महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या आजच्या एक दिवसीय लाक्षणिक संपाला सिंधुदुर्ग जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांना निवेदन सादर केले.
समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित असून या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने आज लाक्षणिक काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. याबाबत शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज काम बंद ठेऊन जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्र येत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांचे आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधत निवेदन सादर केले. या निवेदनातून जिल्ह्यांतर्गत व जिल्हास्तरीय बदल्या व्हाव्यात. महागाईचा विचार करून वेतनवाढ मिळावी. शासन सेवेत कायम करावे. अतिरिक्त कामाचे अतिरिक्त वेतन मिळावे, या प्रमुख मागण्यांसह अन्य विविध मागण्यांकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी व आरोग्य अधिकारी उपस्थित होते.