संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१६p१.jpg ःKOP२३L७५९०३ रत्नागिरी ः उद्योजक राजन मलुष्टे यांचा सत्कार करताना जाधव फिटनेस अॅकॅडमीचे संचालक हेमंत जाधव.
---------------
जाधव फिटनेसतर्फे उद्योजक मलुष्टे यांचा सत्कार
रत्नागिरी ः शहरातील जाधव फिटनेस अॅकॅडमीच्या दुसऱ्या वर्धापनदिनात मलुष्टे स्टील अॅण्ड पाइपचे मालक राजन मलुष्टे यांचा सत्कार आला. पहिल्या मराठा श्री शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांना राजन मलुष्टे यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. त्याची दखल घेऊन ॲकॅडमीचे संचालक हेमंत जाधव यांनी त्यांच्या फर्मच्या ठिकाणी जाऊन त्यांचा भव्य नागरी सत्कार केला व पुढील वर्धापनदिनी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्याचा संकल्प केला आहे.

बुद्धिस्ट सेवानिवृत्त महासंघातर्फे वधू-वर मेळावा
रत्नागिरी ः बुद्धिस्ट सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी महासंघातर्फे बौद्ध समाजातील इच्छुक वधू-वर व पालक यांचा २०वा परिचय मेळावा २२ जानेवारीला सकाळी १० वाजता रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक सगकारी पतसंस्था मर्यादित, साळवी स्टॉप येथे आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध समाजबांधवांसाठी या मेळाव्याचे आयोजन आहे. उच्च शिक्षित ते कमी शिक्षित शहरी व ग्रामीण भागातील इच्छुक प्रथम वर-वधू तसेच घटस्फोटित व विधूर यांनी या मेळाव्यास पालकांसमेवत सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे. मेळाव्यास येताना अलिकडील पोस्टकार्ड फोटो, बायोडाटा सोबत आणावा. अधिक माहितीसाठी गोपीनाथ साळवी, भास्कर कुरतडकर, एम. बी. कांबळे, भार्गव जाधव यांच्याशी संपर्क साधावा.
------


मनसेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार
मंडणगड ः मंडणगड तालुक्यात मनसेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या ३ सदस्यांचा मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्या हस्ते खेड येथे सत्कार करण्यात आला. देव्हारे ग्रामपंचायत सदस्य अर्चना अरुण दुर्गवले, प्रतिभा मांडवकर, लोकरवण ग्रामपंचायत सदस्य गणपत संवादकर, शिगवण ग्रामपंचायत सदस्य योगेश धामणे हे मनसेचे कार्यकर्ते निवडणुकीत विजयी झाले व मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीचे सत्ताकारण लोकप्रतिनिधी या नात्याने प्रवेश केला आहे. तालुकाध्यक्ष महेश कंचावडे उपस्थित होते. मनसे मंडणगड शाखेने पोलिस भरतीसाठी तालुक्यातील पात्र उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी ऑनलाइन सेवा शहरातील वक्रतुंड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात आली होती.
------------


बेलोसे महाविद्यालयात तिळगुळ वाटप
हर्णै ः शिक्षणात खंड पडला म्हणून न थांबता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमास प्रवेशित विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करून संधीचे सोने करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. भारत कऱ्हाड यांनी केले. मकर संक्रांतीच्यानिमित्ताने वराडकर-बेलोसे कॉलेज येथे तिळगुळ वाटप कार्यक्रम झाला. प्रा. दीपक गडकर यांनी सर्वांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला प्रा. मगदूम, ग्रंथपाल तेजस रेवाळे, मनोज मोरे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या विविध अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.