थीम पार्क उभा करा

थीम पार्क उभा करा

Published on

rat१६२२.txt

( पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat१६p८.jpg ः
७५९१२
मुंबई ः राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देताना मिहीर महाजन सोबत आमदार उमा खापरे.
---
दापोलीत थीम पार्क उभा करा

दाभोळ ः दापोली तालुका सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असा तालुका आहे. या तालुक्यातून महर्षी कर्वे, पां. वा. काणे असे भारतरत्न याशिवाय लोकमान्य टिळक, सानेगुरूजी, रंग्लर परांजपे अशी अनेक दिग्गज मंडळी घडली आहेत. तसेच शेजारील आंबडवे हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव आहे. या सर्वांचा सन्मान ठेवत या भारतरत्नांचे एक थीम पार्क दापोलीत करावे, अशी मागणी मिहीर महाजन यांनी आमदार उमा खापरे यांच्या मार्गदर्शनात राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. या भेटीदरम्यान हर्णै येथील ऐतिहासिक सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या विकासाबाबत देखील चर्चा झाली. गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला दरम्यान रोप वे उभारण्याच्या कामाला गती देण्यासाठी आमदार खापरे यांनी विनंती केली असता सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना संबंधित शिफारस करणारे पत्र तयार करून पाठवले आहे. या वेळेस मुनगंटीवार यांनी तरुणांनी आपापल्या भागाच्या विकासासाठी असेच प्रयत्नशील राहण्याचे आवश्यक असल्याचे नमूद केले.
--
जनकल्याण पतसंस्थेचे कार्य आदर्शवत

दाभोळ ः गेली २७ वर्षे सहकार क्षेत्रात पारदर्शकपणे काम करून ग्रामीण भागातील अग्रगण्य पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवलेली असोंड येथील जनकल्याण ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे कार्य आदर्शवत व उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुले यांनी काढले. त्यांनी नुकतीच असोंड येथील पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली. कोकण पतसंस्था फेडरेशनचे महत्व, उद्देश, घटना व कामकाज त्याचप्रमाणे होणारे फायदे व वसुलीसंदर्भात मार्गदर्शन केले. असोंड पतसंस्थेने ४० कोटींचा व्यवसाय पूर्ण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष दशरथ पाटील, विश्वकर्मा पतसंस्थेचे अध्यक्ष विठोबा देवघरकर, व्यवस्थापक दिगंबर देवघरकर, आदर्श पतसंस्था कोळबांद्रेचे अध्यक्ष बाळकृष्ण काष्टे, सरोदे समाज पतसंस्था टेटवलीचे अध्यक्ष सुभाष क्षीरसागर आदी उपस्थित होते.
--
दापोलीत सुरक्षितता अभियान

दाभोळ ः एसटीच्या दापोली आगारात दापोली पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विलास पड्याळ व वाहतूक पोलिस भूषण सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरक्षितता अभियान सन २०२३चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला स्थानकप्रमुख रेश्मा मधाळे, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक मुनाफ राजापकर, वाहतूक निरीक्षक हर्षल नाफडे, वरिष्ठ लिपिक प्रणव रेळेकर, उपस्थित होते. या वेळी आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांनी कर्मचाऱ्यांना सुरक्षितता अभियानाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत झिंगे यांनी केले.
--
निवृत्त महसूल कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी

मंडणगड ः मंडणगड तालुका निवृत्त महसूल कर्मचारी संघटनेची सन २०२३ -२४ या वर्षाकरिता नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष अबुमियाँ जोगीलकर यांच्या अध्यक्षतेखील संघटनेची सभा मुंकद धामणस्कर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आली. या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. जमाखर्चास मान्यता देण्यात आली. ६५ वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. सभेच्या समारोपास २०२३-२४ या वर्षांकरिता संघटनेची नवीन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. अध्यक्षपदी अबुमियाँ जोगीलीकर, उपाध्यक्षपदी एन. बी. नाकती, सचिवपदी मुकुंद धामणस्कर, सहसचिवपदी एन. एम. मोरे, खजिनदारपदी एम. व्ही. जोशी, सहखजिनदारपदी व्ही. एस. नगरकर यांची निवड झाली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com