
कळणे मायनिंग येथे रस्ता सुरक्षा सप्ताह
swt१६२६.jpg
७६०१९
कळणेः येथे मार्गदर्शन करताना मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील. सोबत अनिल पावसकर व इतर. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
कळणे मायनिंग येथे
रस्ता सुरक्षा सप्ताह
बांदाः अपघात टाळण्यासाठी कधीही एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या एका चुकीमुळे आपले व समोरच्याचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. यासाठी सर्व चालकांनी आरटीओने दिलेल्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र पाटील यांनी कळणे येथे केले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने कळणे मायनिंग येथे रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी वाहतूक पोलिस शाखेचे प्रदीप पुजारी, भूषण नाईक, अनिल मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अनिल पावसकर, कळणे मायनिंगचे व्यवस्थापक अमित कायसुयकर, सरव्यवस्थापक शेखर गावकर, व्यवस्थापक किरण गाड, पियुसी केंद्राचे योगेश केसरकर, दशरथ कदम, दीपेंद्र कापसे आदी उपस्थित होते. यावेळी निरीक्षक पाटील यांनी वाहतूक नियमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी वाहनांना रेडीयम व रिफ्लेक्टर लावण्यात आले. आभार अनिल पावसकर यांनी मानले.
................
सावंतवाडीत शुक्रवारी क्रिकेट निवड चाचणी
सावंतवाडीः महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशन आयोजित निमंत्रितांच्या साखळी स्पर्धेसाठी १९ वर्षांखालील मुलांचा लेदर बॉल क्रिकेट संघ निवडण्यासाठी येथील जिमखाना मैदानावर निवड चाचणी स्पर्धा शुक्रवारी (ता. २०) सकाळी ९ वाजता आयोजित केली आहे. १ सप्टेंबर २००४ नंतर जन्मलेल्या व जिल्ह्यात रहिवास असलेल्या मुलांना निवड चाचणीत सहभागी होता येईल. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र खेळाडूंनी पूर्ण गणवेशासह रहिवास पुरावा व जन्म दाखला घेऊन उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी रघुनाथ धारणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन असोसिएशनचे सहसचिव काशिनाथ दुभाषी यांनी केले आहे.
...............