
शिवडाव विद्यालयात आकाश दर्शन कार्यक्रम
शिवडाव विद्यालयात आकाश दर्शन कार्यक्रम
कणकवली, ता. १७ : शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे शुक्रवारी (ता. २०) सावंत फाऊंडेशन कळसुली या संस्थेच्यावतीने आकाशदर्शन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुंबईहून खगोलतज्ञ उपस्थित राहून मोठ्या क्षमतेच्या दुर्बिणींद्वारे आकाशातील ग्रहताऱ्यांची रचना समजावून सांगणार आहेत. आपल्या अफाट विश्वाचा आपल्याला परिचय व्हावा तसेच खगोलशास्त्राविषयी आपली समज वाढावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती शिवडाव विद्यालयाच्यावतीने देण्यात आली. या कार्यक्रमात खगोलशास्त्रज्ञ खगोलशास्त्रावर सादरीकरण तसेच व्हिडिओद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यक्रमाचा खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मसवेकर, शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, शिवडाव सेवा संघ मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गांवकर तसेच सावंत फाऊंडेशनचे शरद सावंत यांनी केले आहे.