शिवारआंबेरेत महाविद्यालयाच्या इमारत कामाला प्रारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवारआंबेरेत महाविद्यालयाच्या इमारत कामाला प्रारंभ
शिवारआंबेरेत महाविद्यालयाच्या इमारत कामाला प्रारंभ

शिवारआंबेरेत महाविद्यालयाच्या इमारत कामाला प्रारंभ

sakal_logo
By

rat१७४२.txt

(पान चार साठी)

फोटो ओळी
-rat१७p३५.jpg-
७६२७१
पावस ः शिवार आंबेरे येथे महाविद्यालयाच्या नूतन इमारतीच्या कामाचा आरंभ करताना नरेंद्र घाणेकर.
---

महाविद्यालयाच्या इमारत कामास प्रारंभ

पावस, ता. १८ ः श्रमिक किसान सेवा समिती रत्नागिरी संचलित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले इंग्लिश मीडियम स्कूल, श्रमिक विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवारआंबेरे रत्नागिरी अंतर्गत लोकनेते शामरावजी पेजे यांची १०६ वी जयंती आणि महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा नरेंद्र घाणेकर यांच्या हस्ते झाला.
या इमारतीसाठी शशिकांत रसाळ अध्यक्ष तथा मुख्य विश्वस्त (कै.) डॉ. केरोपंत मजगांवकर, मुंबई चॅरिटेबल ट्रस्ट यांनी संस्थेला भरघोस देणगी देऊन इमारतीच्या पायाभरणी मोलाचा वाटा उचलला. या वेळी नरेंद्र घाणेकर यांनी महाविद्यालयातील भौतिक सुविधा यांचा आढावा घेऊन ज्या काही त्रुटी आहेत त्यासाठी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम होऊन संस्थेचे व महाविद्यालयाचे नावलौकिक करावे व शामरावजी पेजे यांचा आदर्श अंगीकारावा, असे मत व्यक्त केले. नंदकुमार मोहिते यांनी पेजे यांच्या उत्तुंग कार्याला आदरांजली वाहिली. या वेळी बी. जी. ठुकरूल, सुदाम आंब्रे, दीपक लाखण, दीपक राऊत, प्रकाश साळवी, रघुवीर शेलार, मधुकर थुळ, राकेश आंबेकर, सूर्यकांत पाडावे उपस्थित होते.
---