
इन्सुलीत दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचा गौरव
swt1736.jpg
76340
इन्सुलीः गुरुनाथ पेडणेकर यांचा सत्कार करताना प्रमोद कामत. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)
इन्सुलीत दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचा गौरव
दुग्ध संस्थेचा पुढाकार ः नववा नवर्धापन दिन उत्साहात साजरा
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १७ ः इन्सुली येथील सहकारी दुग्ध संस्थेचा नववा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी संजय सावंत, रुपेश कुडव, अशोक शेट्ये, रामा कुडव, महेश कोठावळे या दुग्ध उत्पादकांना माजी शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संस्थेचे माजी संचालक व इन्सुली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विनोद गावकर यांनाही सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती अंकुश जाधव, पंढरी राऊळ, उमेश पेडणेकर, विकास केरकर, सी. व्ही. सावंत, विनेश गवस, प्रवीण देसाई, डेगवे सरपंच राजन देसाई, संजय सावंत, सहदेव सावंत, सखाराम बागवे, महेंद्र पालव, विलास गावडे, रामचंद्र पालव, सुहानी गावडे, साबाजी परब, रघुवीर देऊलकर, सुधीर गावडे आदी उपस्थित होते.
पेडणेकर म्हणाले, "इन्सुली गावातील शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने दुधाचा शाश्वत व्यवसायाकडे सकारात्मक दुष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. यासाठी गोकूळकडून दरही चांगला मिळतो. कोल्हापूर जिल्ह्यासाठी असणाऱ्या विविध योजना गोकूळ व सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक राबविणार आहे. याचा फायदा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी घेऊन दिवसाला एक हजार लिटर दूध दशक महोत्सवी वर्षामध्ये संकलित करण्याचा संकल्प करावा." कामत यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. अवघ्या दहा लिटरवर सुुवात करण्यात आलेली संख्या आज साडेसहाशे लिटर व एक नवीन शाखा स्थापन करून दुग्ध उत्पादनात आदर्श निर्माण करणारी संस्था ठरली आहे, असे ते म्हणाले. यावेळी कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सिध्देश कलिंगण यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक पेडणेकर यांनी, सूत्रसंचालन गौरवी पेडणेकर यांनी केले. आभार विनोद गावकर यांनी मानले.