कणकवलीत माघी गणेश जयंती

कणकवलीत माघी गणेश जयंती

कणकवलीत माघी गणेश जयंती
कणकवली,ता.१८ : येथील श्री सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे २४ ते २६ जानेवारीदरम्यान उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवारी (ता. २४) सकाळी ५ वा. श्री गणेशमूर्तीचे आगमन होईल. बुधवारी (ता. २५ ) सकाळी सातपासून गणेशमूर्ती प्रतिष्ठापणा व पूजा, सत्यनारायण महापूजा, महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी एकला महाप्रसाद, अडीचला श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, जानवलीचे बुवा रवी राणे यांचे भजन, श्री कोटेश्वर नवतरुण प्रासादिक भजन मंडळ, हरकुळ बु.चे बुवा अभिषेक शिरसाट यांचे भजन, प. पू. भालचंद्र प्रासादिक भजन मंडळ, हळवलचे बुवा भास्कर गावडे यांचे भजन, श्री मेजारेश्वर प्रासादिक भजन मंडळ, नागवेचे बुवा अमेय आर्डेकर, श्री राधाकृष्ण प्रासादिक भजन मंडळ, जानवलीचे बुवा उदय राणे यांचे भजन, श्री गांगेश्वर अनभवानी प्रासादिक भजन मंडळ, डामरेचे बुवा चिन्मय सावंत यांचे भजन होईल. साडेआठला महाआरती, साडेनऊला जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, दांडेली-आरोस, सावंतवाडी यांचा ‘शिव महाकाल’ हा प्रयोग सादर होईल. गुरुवारी (ता. २६) सायंकाळी पाचला सिंधुगर्जना ढोल पथकासह श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक निघणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com