
रामदूरकर कॅरममध्ये उपांत्य फेरीत
76431
सावंतवाडी ः साक्षीला गौरविताना रवी घोसाळकर, किरण बोरावडेकर, मिलिंद साप्ते आदी.
रामदूरकर कॅरममध्ये उपांत्य फेरीत
सावंतवाडी ः चिपळूण-डेरवण येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत येथील मुक्ताई ॲकॅडमीची साक्षी रामदूरकर हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. अकरा वर्षीय साक्षीने लातूर, नागपूर, मुंबईतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करून चौदा वर्षांखालील गटात राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावला. तिला मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरमप़टू प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षीने तालुक्यात, जिल्ह्यात आणि विभागीय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारी आणि राष्ट्रीयस्तरावर निवड होणारी जिल्ह्यातील एकमेव खेळाडू होण्याचा बहुमान मिळविला. तिने मागील सहा महिन्यांत केलेल्या सरावाच्या जोरावर अनुभवी आणि दिग्गज खेळाडूंचा पराभव करून हे यश प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ कॅरमपटू प्रशिक्षक रवी घोसाळकर यांच्या हस्ते आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडाधिकारी किरण बोरावडेकर, रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव मिलिंद साप्ते तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत चषक आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. आतापर्यंत मुक्ताई ॲकॅडमीच्या चार मुलींची राष्ट्रीयस्तरावर आणि बाराजणांची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
..................
76432
पाट ः इंटरमिजिएट परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसोबत शिक्षक.
पाट विद्यालयाचे ‘रेखाकले’त यश
कुडाळ ः शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट) परीक्षेत एस. एल. देसाई, पाट विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला. यात दत्तराज ठाकूर, योगेश सरमळकर, जीवन गोसावी, पार्थ गोसावी, शुभम चव्हाण, प्रतीक मेतर, संचिता पाटकर, मंदार कोचरेकर यांनी ‘अ’ श्रेणी प्राप्त केली. तर सात विद्यार्थ्यांना ‘ब’ श्रेणी मिळाली. परीक्षेत एकूण ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांचे कौतुक संस्था उपाध्यक्ष डी. ए. सामंत, कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव सुधीर ठाकूर, संस्था पदाधिकारी देवदत्त साळगावकर, सुहास आजगावकर, संजय ठाकूर, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, शिक्षक प्रतिनिधी गुरुनाथ केरकर यांनी केले. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक संदीप साळसकर यांनी मार्गदर्शन केले.