
सरंबळ हायस्कूलचे यश
७६४२८
सरंबळ ः तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सरंबळ हायस्कूलने यश संपादन केले.
सरंबळ हायस्कूलचे यश
कुडाळ ः तालुकास्तरीय ५० व्या विज्ञान प्रदर्शनात सरंबळ हायस्कूलने यश मिळविले. विज्ञान प्रदर्शन श्री लिंगेश्वर विद्यालय, तुळसुली येथे झाले. या प्रदर्शनात सरंबळ इंग्लिश स्कूल, सरंबळ या प्रशालेच्या विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाले. निबंध स्पर्धा मोठ्यात गटात (नववी ते दहावी) रिचा चव्हाण (दहा), प्रश्नमंजुषा स्पर्धेत हर्षा तोंडवळकर (नववी), साधी आसोलकर (दहावी) या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. लहान गटात (सहावी ते आठवी) प्रतिकृतीमध्ये भावेश रेडकर (सातवी) याच्या ‘अॅन्टी स्लिपींग अलार्म फॉर ड्राईव्हस’ या प्रतिकृतीचा द्वितीय क्रमांक आला. त्याची जिल्हास्तरावर निवड झाली. निबंध स्पर्धेत अनुष्का परब या विद्यार्थिनीने लहान गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तिची जिल्हास्तरावर निवड झाली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत लहान गटात अनुष्का परब व आर्या गावडे यांनी सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांना शिक्षक भरत चौधरी, संदीप परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष रामचंद्र राऊत, सरचिटणीस राजेंद्र परब, शाखाध्यक्ष जयप्रकाश गावडे, शाखा चिटणीस प्रसाद साटम, मुख्याध्यापक अनिल होळकर आदींनी अभिनंदन केले.