
संजय राऊत यांच्यावर कारवाई करा
76475
कणकवली : येथील पत्रकार परिषदेत बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली. शेजारी गणेश राणे, दादा साईल आदी.
संजय राऊत यांच्यावर कारवाई करा
राजन तेली : मंत्री राणेंबद्दल प्रक्षोभक वक्तव्ये
कणकवली, ता.१८ : केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याबद्दल अपशब्द वापरत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राजन तेली यांनी केली.
कणकवलीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गणेश राणे, भाजप कुडाळ तालुकाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र सामंत, नेहा खोत उपस्थित होते. श्री.तेली म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी अपशब्द व पातळी सोडून टीका करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आता कारवाईची मागणी करत आहे; मात्र सुरुवात कोणी केली हे त्यांनी तपासण्याची गरज आहे. भाजपच्या नेत्यांवर टीका करायची, मुद्दामहून आरोप करायचे आणि मग प्रसिद्धीच्या झोतात राहायचं, अशी राऊत यांची सवय आहे. तसेच प्रक्षोभक वक्तव्य करून ते राज्यातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र अशांवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी.
-----------
चौकट
ज्ञानेश्वर म्हात्रेंचा एकतर्फी विजय
कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा एकतर्फी विजय होणार आहे. भाजप - बाळासाहेबांची शिवसेना आणि शिक्षक संघटनांच्या बैठकीत म्हात्रे यांच्या विजयासाठी रणनीती आखली आहे. संपूर्ण कोकणात जोरदार प्रचार सुरू आहे. म्हात्रे हे स्वतः शिक्षक असून मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. त्यामुळे शिक्षक आणि संस्थाचालकांच्या समस्यांची जाणीव त्यांना आहे, असे श्री. तेली म्हणाले.