देवगडमध्ये भाजपतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडमध्ये भाजपतर्फे निवेदन
देवगडमध्ये भाजपतर्फे निवेदन

देवगडमध्ये भाजपतर्फे निवेदन

sakal_logo
By

७६४८०

देवगडमध्ये भाजपतर्फे निवेदन

देवगड, ता. १८ ः केंद्रीयमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्याविषयी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी येथील भाजपची मागणी आहे. याबाबतचे निवेदन तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथील पोलिसांना दिले.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, अमोल तेली, योगेश पाटकर, उत्तम बिर्जे, दयानंद पाटील, नगरसेवक गटनेते शरद ठुकरूल, नगरसेविका प्रणाली माने, मिलिंद माने, प्रकाश राणे, शैलेश लोके आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, केंद्रीयमंत्री राणे यांच्याबद्दल खासदार राऊत यांनी अपशब्द वापरून मानहानिकारक अपमान केला आहे. याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा तालुका भाजपच्यावतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.