दिलीप भालेकर यांचा सावंतवाडीत सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिलीप भालेकर यांचा 
सावंतवाडीत सत्कार
दिलीप भालेकर यांचा सावंतवाडीत सत्कार

दिलीप भालेकर यांचा सावंतवाडीत सत्कार

sakal_logo
By

76702
सावंतवाडी : दिलीप भालेकर यांचा सत्कार करताना व्यापारी बांधव.

दिलीप भालेकर यांचा
सावंतवाडीत सत्कार
सावंतवाडी, ता. १९ ः सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी (परिट) महासंघातर्फे राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा आज येथे सत्कार करण्यात आला. जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला.
यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, नीलेश धडाम, नंदन वेंगुर्लेकर, तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, चित्तरंजन रेडकर, बाळासाहेब बोर्डेकर, किरण सिद्धे, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, ॲड. संजू शिरोडकर, हेमंत मुंज, वल्लभ नेवगी, आसिफ बिजली, संदेश परब, दत्ता सावंत आदींची उपस्थिती होती.
व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर व सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर व सर्व व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भालेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भालेकर यांनी हा माझा घरचा सत्कार असून तो कधीही विसरू शकणार नाही, असे सांगून व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी तसेच व्यापारी बांधवांचे आभार मानले.