परीक्षाकेंद्र सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परीक्षाकेंद्र सुरू
परीक्षाकेंद्र सुरू

परीक्षाकेंद्र सुरू

sakal_logo
By

rat२०१६.txt

बातमी क्र.. १६ (टुडे पान २ साठी)


गांधर्व मंडळ सत्र परीक्षांचे केंद्र सुरू

रत्नागिरी ः अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या एप्रिल-मे सत्राच्या परीक्षांचे केंद्र येथील यशवंतराव पटवर्धन संगीत अकादमी येथे सुरू झाले आहे. पटवर्धन अकादमीत गांधर्व महाविद्यालयाचे अनेक वर्षे नोव्हेंबर-डिसेंबर सत्राच्या परीक्षांचे केंद्र यशस्वीरित्या सुरू आहे. या कामाची दखल घेऊन मंडळातर्फे एप्रिल-मे सत्राचेही केंद्र अकादमीला देण्यात आले आहे. मुख्य बसस्थानकासमोरील गोदुताई जांभेकर विद्यालयात या अकादमीचे कार्यालय असून याच विद्यालयात लेखी आणि प्रत्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. रत्नागिरीत एप्रिल-मे सत्राचे केंद्र सुरू झाल्यामुळे रत्नागिरी आणि परिसरातील अनेक विद्यार्थ्यांची सोय झाली आहे अन्यथा येथील विद्यार्थ्यांना चिपळूणला जाऊन परीक्षा द्यावी लागणार होती. २०२३च्या एप्रिल-मे सत्र परीक्षांचे अर्ज ऑनलाइन भरण्याचे काम १५ जानेवारीपासून सुरू झाले असून याची मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लवकरत लवकर ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन केंद्राच्या व्यवस्थापिका राधा भट यांनी केले आहे.
---
संगीत नाट्यस्पर्धेची आज तिकीट विक्री

रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनायाच्या संगीत राज्य नाट्यस्पर्धांना २३ जानेवारीपासून सुरवात होणार होती; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे उद्घाटनाच्या दिवशी होणारे नाटक रद्द झाल्यामुळे येत्या २४ जानेवारीपासून येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात स्पर्धांचे उद्घाटन व त्यानंतर सायंकाळी ७ वा. संगीत नाट्यस्पर्धा रंगणार असल्याची माहिती स्पर्धा समन्वयकांनी दिली. रत्नागिरी केंद्रावर यावर्षी अंतिम फेरीत जुन्या नव्या संहितांसह २५ संगीत नाटकांचा समावेश आहे. गोवा राज्यासह राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अहमदनगर, सांगली येथील नाट्यसंस्थांचे संगीत नाट्यप्रयोग रसिकांना पाहावयास मिळाणार आहे. रत्नागिरी केंद्रावर जिल्ह्यातील प्रेक्षकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन यावर्षीही शासनाने या नाट्यस्पर्धेची सीझन तिकीटविक्री सुरू केली होती. यामध्ये आजपर्यंत १५० सीझन तिकिटांची विक्री झाली आहे; मात्र काही नाट्यप्रेमी रसिकांना अजूनही सीझन तिकीट मिळाले नाही. त्यासाठी रविवारी (ता. २२) सायं. ४ ते रात्री ८ या वेळेत तिकीट देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नाट्यप्रेमी रसिकांनी सीझन तिकीट काढून शासनाच्या या संगीत नाट्यस्पर्धांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक नंदकिशोर जुवेकर यांनी केले.
--