‘शिक्षक भारती’ची आज कुडाळात सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षक भारती’ची 
आज कुडाळात सभा
‘शिक्षक भारती’ची आज कुडाळात सभा

‘शिक्षक भारती’ची आज कुडाळात सभा

sakal_logo
By

७६९५२
कपिल पाटील

‘शिक्षक भारती’ची
आज कुडाळात सभा
कुडाळ ः शिक्षक भारती संघटनेतर्फे उद्या (ता.२१) येथील मराठा हॉलमध्ये येथे दुपारी साडेतीनला शिक्षकांसाठी सभेचे आयोजन केले आहे. यावेळी कोकण शिक्षक मतदार संघाचे उमेदवार धनाजी पाटील, आमदार कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर आणि जिल्हा तालुका पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सभा होणार आहे. गेल्या वर्षी बॅरिस्टर नाथ पै यांची जन्मशताब्दी वर्ष होते आणि २१ जानेवारीपासून कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू होत आहे. म्हणून शिक्षक भारतीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत साहित्यिक प्राध्यापक प्रवीण बांदेकर यांचा बॅरिस्टर नाथ पै पुरस्काराने तर संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळमधील प्रा. डॉ. अनंत लोखंडे (माजी सिनेट सदस्य मुंबई विद्यापीठ सहयोगी प्राध्यापक व अर्थशास्त्र विभाग प्रमुख संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ) यांचा प्राध्यापक मधु दंडवते पुरस्काराने सन्मान होणार आहे.
---
टोल मुक्तीसाठी
स्वाक्षरी मोहीम
कणकवली : टोल मुक्त कृती समिती सिंधुदुर्ग च्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोल मुक्ती मिळावी याकरिता फोंडाघाट येथून सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. उद्या (ता.२१) सकाळी दहा वाजता फोंडाघाट एसटी स्टँड येथून ही सह्यांची मोहीम सुरू होणार आहे.तरी फोंडा पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी सिंधुदुर्गातून टोल हद्दपार करण्यासाठी फोंडाघाटवासीयांच्या माध्यमातून विरोध दर्शविण्यासाठी या मोहिमेमध्ये सामील व्हा, असे आवाहन कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांनी केले आहे.
--------------
नाभिक संघटनेची
मालवणात बैठक
मालवण ः तालुका महिला नाभिक संघटनेची बैठक २३ ला येथील भैरवी मंदिर येथे दुपारी ४ वाजता आयोजित आली आहे. बैठकीत संघटनेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या हळदीकुंकू समारंभाचे नियोजन करण्यात येणार आहे. बैठकीला महिला नाभिक संघटना जिल्हाध्यक्षा प्रतिभा चव्हाण, तालुकाध्यक्षा दीपाली शिंदे तसेच महिला कार्यकारिणी सदस्या मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील सर्व महिला विभागप्रमुख, महिला कार्यकर्त्या तसेच शहरातील महिला भगिनी. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन दीपाली शिंदे यांनी केले आहे.
-------------------
गिरोबा मंदिरात
विविध कार्यक्रम
मालवण ः काळेश्‍वर ग्रामस्थ उत्सव कमिटीतर्फे २४ ला सकाळी ९ वाजता गिरोबा मंदिर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २४ ला सकाळी ९ वाजता गोमाता पूजन, १० वाजता पंचकुंडी गायत्री महायज्ञ, दुपारी २ ते ३ महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता हिंदू संस्कृतीत वाढदिवस कसा साजरा केला जातो, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सायंकाळी सहाला दीपयज्ञ दीपोत्सव, नंतर महाआरती व प्रसाद वाटप होणार आहे. हा सोहळा हरिद्वार येथील महिला परोहितांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे.