चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती
चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती

चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती

sakal_logo
By

rat२०४१.txt

( पान ३ साठी, अॅंकर)

चिपळूण पालिकेच्या कचरा प्रकल्पातून खत निर्मिती

चाचण्या, तपासणी ; बायोगॅससह, वीजनिर्मितीचे नियोजन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० ः नगरपालिकेच्या अत्याधुनिक बायोमेट्रिक कचरा प्रकल्पातून खत निर्मितीला सुरवात झाली आहे. प्राथमिक स्वरूपात ही खत निर्मिती असून तांत्रिक आणि प्रायोगिक चाचण्या व तपासणी पूर्ण झाल्यानंतर पूर्णक्षमतेने खत निर्मिती सुरू केली जाणार आहे. तसेच बायोगॅस व वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच हे महत्वाकांक्षी प्रकल्प देखील पूर्ण होणार आहेत.

शिवाजीनगर येथील ६ एकर जमिनीत कचरा प्रकल्प राबवण्यात आला आहे. शहरातील हजारो टन कचरा येथे रोज साठवला जातो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून विविध यंत्रणेसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. या उद्देशाने चिपळूण नगरपालिका प्रशासनाने त्याच ठिकाणी बायोमेट्रिक प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला आता यश येऊन उत्पादनाला सुरवात झाली आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीमधून कचरा प्रकल्पावर बायोगॅस आणि बायोमेट्रिक असे दोन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी दोन वेगवेगळ्या इमारती बांधण्यात आल्या असून सुमारे ८० लाखाहून अधिक रुपयांची अत्याधुनिक यंत्रसामुग्री येथे बसवण्यात आली आहे. बायोगॅस प्रकल्पाची क्षमता ५ टन कंपोस्टिंगची असून बायोमेट्रिक प्रकल्पाची क्षमता २२ टन कंपोस्टिंगची आहे. कचऱ्यावर या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून खत, गॅस निर्मिती व वीज निर्मिती केली जाणार आहे. बायोमेट्रिक प्रकल्पाच्या माध्यमातून आता प्राथमिक तत्वावर खत निर्मिती सुरू करण्यात आली आहे. प्रथमच हे उत्पादन घेण्यात आले असून पुढे त्याचे तांत्रिक व प्रायोगिक चाचण्या व तपासणी होणार आहे. त्यानंतरच प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करून खत निर्मिती केली जाणार आहे.
-
स्वच्छता विभागाची मेहनत...
चिपळूण नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाची जबाबदारी वैभव निवाते यांच्याकडे दिल्यानंतर या विभागात त्यांनी कुशलतेने काम केले. शहर स्वच्छतेकडे लक्ष देतानाच त्यांनी प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतली. स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळेच हे प्रकल्प वेळेत पूर्णत्वाकडे जाण्यास मदत झाली आहे.