पाडलोस ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

पाडलोस ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

Published on

77116
पाडलोस : प्रेक्षणीय सामन्यावेळी उपस्थित बांदा पोलिस व पाडलोस ग्रामस्थ.

‘पाडलोस’ ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

पोलिस निरीक्षक काळे; क्रिकेट स्पर्धांना प्रतिसाद

बांदा, ता. २१ ः पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपचे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. ग्रुपतर्फे गावाला एकत्रित आणण्याचे काम समाधानकारक आहे, असे प्रतिपादन येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शामराव काळे यांनी केले.
पाडलोस व्हॉट्सअप ग्रुपतर्फे आयोजित चौथ्या पर्वातील ‘बांदा पोलिस’ विरुद्ध ‘रवळनाथ पाडलोस’ या प्रेक्षणीय सामन्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, ग्रामपंचायत सदस्य काका परब, निवृत्त मुख्याध्यापक कृष्णा करमळकर, पत्रकार विश्वनाथ नाईक, पोलिसपाटील रश्मी माधव, ग्रुपचे अध्यक्ष विश्राम गावडे, सर्व सहकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. गावाला एकत्र आणण्याचे काम ग्रुपने केले आहे. बाहेरगावी असलेले नागरिक क्रिकेटमुळे एका ठिकाणी येत असून ही चांगली बाब आहे. सामना पाहण्यासाठी ग्रामस्थांची झालेली गर्दी पाहून भारावून गेलो, असे पोलिस निरीक्षक काळे म्हणाले. राजा आंबेकर व प्रणित गावडे यांनी सूत्रसंचालन केले. अमेय गावडे यांनी आभार मानले. हा सामना रंगतदार झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com