पळसंब ग्रामपंचायतीतर्फे ‘सरपंच आपल्या दारी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसंब ग्रामपंचायतीतर्फे 
‘सरपंच आपल्या दारी’
पळसंब ग्रामपंचायतीतर्फे ‘सरपंच आपल्या दारी’

पळसंब ग्रामपंचायतीतर्फे ‘सरपंच आपल्या दारी’

sakal_logo
By

77193
पळसंब ः ‘सरपंच आपल्या दारी’ अंतर्गत पत्रकांचे वाटप करताना सरपंच महेश वरक व अन्य.

पळसंब ग्रामपंचायतीतर्फे
‘सरपंच आपल्या दारी’
आचरा ः गावातील नागरिकांच्या गरजा आणि समस्या समजून घेऊन त्यांचे लिखित स्वरुपात संकलन आणि या माहितीच्या आधारावर येत्या काळात गाववासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पळसंबचे नूतन सरपंच महेश वरक यांनी ‘सरपंच आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम राबविला. गावात घरोघरी फिरून माहिती संकलन करण्यासाठी पत्रकांचे वाटप केले. या गावभेट कार्यक्रमांतर्गत गावातील प्रत्येक कुटुंब निहाय एक पत्रक तयार करून ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आले. प्रत्येक कुटुंबाने ते भरून उद्या (ता. २२) वार्डनिहाय नेमून दिलेल्या ठिकाणी एकत्रितपणे आणून द्यायची आहेत. या माहितीच्या आधारावर गाववासीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे सरपंच वरक यांनी सांगितले. या गावभेट कार्यक्रमात सरपंच वरक यांच्यासह उपसरपंच अविराज परब, भाजपाचे भटके विमुक्त आघाडी जिल्हा संघटन मंत्री सुनील खरात, सुभाष तर्फे, सुहास सावंत, अरुण माने, मधुकर कदम, ग्रामपंचायत कर्मचारी शैलेश अनावकर आदी सहभागी झाले.
.....................
कुडोपीत मोबाईल टॉवर मंजूर
आचरा ः मालवण तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या कुडोपी गावात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना समस्यांचा सामना करावा लागत होता. या गावचे माजी सरपंच तुषार पाटणकर यांच्या पाठपुराव्यामुळे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून गावासाठी बीएसएनएल मोबाईल टॉवर मंजूर झाला आहे. भारत दूरसंचार निगमचे केवडे आणि श्रावण मंडळ अधिकारी पवार यांनी कुडोपी-देऊळवाडी येथे भेट देऊन टॉवरसाठी जागा निश्चितीबाबत पाहणी केली. यावेळी माजी सरपंच तुषार पाटणकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पडवळ यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या टॉवरमुळे कुडोपीसह बुधवले, खुडी कोल्हे ढवळवाडी, खुडीपाठ, मळेशेतवाडी या दुर्गम भागातील गावांना फायदा होणार आहे.