वृद्धेच्या खात्यातून काढले 5 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृद्धेच्या खात्यातून काढले 5 लाख
वृद्धेच्या खात्यातून काढले 5 लाख

वृद्धेच्या खात्यातून काढले 5 लाख

sakal_logo
By

rat२१११.txt

(पान ३ साठी)

बँक कर्मचाऱ्यानेच वृद्धेच्या खात्यातून काढले पैसे

काही तासात रक्कम जमा ; निलंबनासह होणार कारवाई

खेड, ता. २१ ः खेड तालुक्यातील एका बँकेतील एका कर्मचाऱ्याने वृद्धेच्या -खातेदाराच्या संमतीशिवाय खोट्या सह्या करून त्याच्या खात्यातून पाच लाख रुपये काढले. हे लक्षात आल्यानंतर बँकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना खातेदार वकिलासह भेटले. त्या वेळी त्या कर्मचाऱ्याने केलेल्या या प्रकाराची कबुली देत काही तासातपैसे भरले. त्या खातेदारांच्या वकीलांनी जनहितार्थ सोशल मीडियावर पोस्ट करत घडलेला हा प्रकार समोर आणला आहे. ज्यांची खाती, एफडी, ठेव या बँकेत आहेत त्यांनी एकदा खात्री करण्याचे आवाहन ही यामाध्यमातून करण्यात आले आहे.

वृद्धेच्या खात्यातून परस्पर ५ लाख रुपये काढून पुन्हा जमा करणाऱ्या ‍या बँकेतील त्या कर्मचाऱ्‍यास बँक व्यवस्थापनाने निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित वृद्धेने बँकेकडे रितसर तक्रार दाखल केली असून, गुन्हा दाखल करण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. येथील बँकेत गेल्या १५ वर्षापासून हा कर्मचारी हंगामी स्वरूपात कार्यरत होता. एक महिन्यापूर्वी त्याने वृद्धेच्या खात्यातून ५ लाख रुपये परस्पर काढल्याचे उघड झाले होते. बँक व्यवस्थापनाने ही बाब गंभीरपणे घेत त्या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली असल्याची चर्चा आहे.
--------------